टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगतदार लढत होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे हा सामना पार पडणार असून दोन्ही संघ अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसतील. (India) या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ऐतिहासिक टप्प्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 499 विकेट्स घेतल्या असून 500 विकेट्सचा मैलाचा दगड गाठण्यासाठी त्याला केवळ एका बळीची गरज आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी20 या तिन्ही प्रकारांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत त्याने भारतासाठी अनेक निर्णायक क्षणी विजय मिळवून दिले आहेत. (India) कसोटीत 234, वनडेमध्ये 149 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 116 विकेट्स अशी त्याची कामगिरी आहे. उपांत्य फेरीसारख्या मोठ्या सामन्यात तो हा विक्रम पूर्ण करतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत सध्या अनिल कुंबळे, रविचंद्रन अश्विन, हरभजन सिंग, कपिल देव, रवींद्र जडेजा, जहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांचा समावेश आहे. बुमराहने एक विकेट घेताच तो या मानाच्या यादीत आठव्या क्रमांकावर स्थान मिळवेल.
इंग्लंडविरुद्धच्या या निर्णायक सामन्यात त्याच्याकडून प्रभावी स्पेलची अपेक्षा आहे. नव्या चेंडूवर स्विंग, मधल्या षटकांत अचूक यॉर्कर आणि डेथ ओव्हर्समध्ये दबाव निर्माण करण्याची त्याची क्षमता भारतासाठी मोठी जमेची बाजू ठरते. (India)उपांत्य फेरीतील त्याची कामगिरी केवळ संघाच्या विजयासाठीच नव्हे तर वैयक्तिक विक्रमासाठीही महत्त्वाची ठरणार आहे. क्रीडाप्रेमींच्या नजरा आता या ऐतिहासिक क्षणाकडे लागल्या आहेत.
हेही वाचा :
स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट
‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत