टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत अखेर टीम इंडियाने धडक मारली आहे. कारण उपांत्य फेरीचा सामना वाटतो तितका सोपा नव्हता. भारताने विजयासाठी 253 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गाठताना इंग्लंडने जीवाची बाजी लावली होती. प्रत्येक चौकार आणि षटकारानंतर धाकधूक वाढत होती. इंग्लंडने 246 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताला निसटता विजय मिळाला असं म्हणायला हरकत नाही. इंग्लंडच्या फलंदाजांना रोखताना भारतीय गोलंदाजांच्या नाकी नऊ आले होते. पण या जसप्रीत बुमराह हा अपवाद ठरला (T20 World Cup 2026) त्याचा सामना करताना इंग्लंडच्या फलंदाजांना खूपच कठीण गेलं. जसप्रीत बुमराहाने 4 षटकात 33 धावा दिल्या आणि एक विकेट काढली. शेवटच्या षटकांमध्ये जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या धावगतीला ब्रेक दिला. त्यामुळे शेवटच्या षटकांमध्ये इंग्लंडसमोर धावांच अंतर वाढलं.

इंग्लंडसमोर भारताच्या सर्वच गोलंदाजांनी 9हून अधिक इकोनॉमी रेटने धावा खर्च केल्या. पण जसप्रीत बुमराहचा इकोनॉमी रेट हा 8.25 इतका होता. प्रत्येक फलंदाजांना माहिती आहे की, बुमराहचा सामना करणं सोपं नाही. पाटा विकेटवरही जसप्रीत बुमराह प्रभावी ठरला. (T20 World Cup 2026) याबाबत दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसी याने खुलासा केला आहे. ईएसपीएल क्रिकइंफोच्या शोमध्ये डुप्लेसी म्हणाला की, ‘बुमराहाची गोलंदाजी शैली फार वेगळी आहे. त्याची शैली समजणं कठीण आहे. त्याच्या हातून किती वेगाने चेंडू निघाला हे समजत नाही. त्याच्या स्किल आहे पण एक्शनचा फायदा मिळतो. असंच काहीसं लसिथ मलिंगाबाबत होतं. त्यांची गोलंदाजीची वेगळी शैली फलंदाजांना खेळणं कठीण जाते.’
डुप्लेसीने सांगितलं की, बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. इंग्लंडच्या डावाच्या पाचव्या षटकातील पहिला चेंडू जसप्रीत बुमराहने स्लोअर टाकला होता. (T20 World Cup 2026) त्याच्या गोलंदाजी शैलीमुळे इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक चाचपडला आणि शॉट खेळताना चुकला आणि झेल उडाला. अक्षर पटेलने त्याचा चांगला झेल पकडला आणि भारताला मोठी विकेट मिळवून दिली.
जसप्रीत बुमराहने 18व्या षटकात मोलाचं योगदान दिलं. इंग्लंडला 18 चेंडूत 45 धावांची गरज होती. या षटकात त्याने फक्त 6 धावा दिल्या आणि 12 चेंडूत 39 धावा अशी स्थिती आणली. डुप्लेसीने सांगितलं की, ‘त्या ओव्हरमध्ये फलंदाजांना माहिती होतं की फुल बॉल येणार किंवा स्लोअर येणार किंवा यॉर्कर येणार. दोन फुलटॉस त्या षकात आली पण सॅम करन शॉट खेळताना चुकला. . दुसरा बॉलर असता तर या चेंडूवर षटकार खाल्ला असता.
हेही वाचा :
Bluetooth आणि Wi-Fi सुरू ठेवल्याने खरंच बॅटरी संपते का? तज्ज्ञ म्हणतात
तुमच्या मुलांचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करू नका नाहीतर
शरीरात प्रोटीनची कमी? दररोजच्या आहारात करा या कडधान्याचा समावेश