घरगुती गॅस दरवाढीचा बॉम्ब आज सकाळी पडला. मध्य-पूर्वेतील युद्धाचा मोठा फटका आणि झळ बसली. गॅस दरवाढी पाठोपाठ पेट्रोल-डिझेलची भाव वाढ होईल का, याची पुन्हा भीती व्यक्त होत आहे.

इराण-इस्त्रायल-अमेरिका युद्धाची धग संपूर्ण जगाला जाणवत आहे. तर भारताला या युद्धाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. आज सकाळीच घरगुती गॅस दरवाढीचा बॉम्ब पडला. मध्य-पूर्वेतील युद्धाचा मोठा फटका बसला आहे. घरगुती गॅस टंचाई रोखण्यासाठी आवश्यक वस्तू अधिनियम सरकारने लागू केला आहे. (gas price) त्याचे परिणाम हॉटेलिंगवर होणार आहे. रेस्टॉरंटसह हॉटेल चालकांना त्याचा मोठा फटका बसेल. तर गॅसचा काळाबाजार होण्याची भीती ही वाढली आहे. दरम्यान ही घडामोड घडत असतानाच पेट्रोल-डिझेलची भाव वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. इंधन तुटवडा होणार नसला तरी गेल्या चार वर्षांपासून स्थिर असलेला इंधन दर यावेळी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यात तेल उत्पादक कंपन्यांनी पंप चालकांनाही मोठ्या सूचना दिल्याने सर्वसामान्य नागरीक धास्तावले आहेत.

युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेट्रोल पंपावर सध्या धास्तीचे वातावरण आहे. (gas price) अनेक पंप चालकांना कंपन्यांकडून आगाऊ रक्कम देण्याच्या सूचना धडकल्या आहेत. युद्धामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या नाशिकमध्ये पेट्रोल 104.77 रुपये प्रति लिटर तर डिझेल 91.28 रुपये प्रति लिटर आहे.

मध्य-पूर्वेतील युद्धाचा मोठा फटका जागतिक तेल उत्पादनाला बसला आहे. इराणकडून कतार आणि इतर देशातील तेल रिफायनरीवर हल्ला झाल्याने तसेच होमूर्झचा समुद्रधुनी बंद होण्याची शक्यता लक्षात घेत कच्चा तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने तेजी दिसून येत आहे. गेल्या सहा दिवसांची आकडेवारी तेच इंगित करत आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. इंधन दर 85 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे पोहचल्या आहेत. तर येत्या काही दिवसात हा दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी नागरिकांना पुरेशा प्रमाणात तेल आणि गॅस साठा उपलब्ध असल्याचे आश्वासन दिले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमती वाढल्या असल्या तरी भारतात तूर्तास दरवाढ होणार नाही असे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले होते. पण एक रात्र उलटत नाही तोच केंद्र सरकारने घुमजाव केले. आज सकाळीच घरगुती गॅसच्या किंमतीत 60 रुपयांची दरवाढवण्याचे जाहीर केले. (gas price) त्यामुळे नागरिकांना धक्का बसला आहे. अर्थात ही दरवाढ तात्पुरती असल्याची सारवासारव आता करण्यात येत आहे. लवकरच इतर देशांकडून नैसर्गिक गॅस खरेदी होऊ शकते. तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारला मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. कारण पुरवठा साखळीवर सध्या मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आताही सरकार पेट्रोल आणि डिझेलचा मोठा साठा उपलब्ध असल्याचा दावा करत आहे. पण गॅस दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलचीही दरवाढ होण्याची भीती नागरिकांना सतावत आहे. रशियाकडून भारताला पुढील 32 दिवस पेट्रोल-डिझेल खरेदी करता येणार आहे

हेही वाचा :

लग्न अर्जुनचं पण चर्चा मात्र सारा तेंडुलकरची, गुलाबी साडीतील सुंदर फोटोंची तुफान चर्चा!

हे 3 साप मेल्यानंतरही माणसाला चावू शकतात, आहेत अत्यंत विषारी, यातील दोन साप तर तुमच्या परिसरात नेहमी दिसतात

वीज बिल कमी आणि वीज वाचण्यासाठी खास ट्रिक्स.. झोपण्यापूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *