मराठी चित्रपटसृष्टीतील काही गाणी अशी असतात जी वर्षानुवर्षे लोकांच्या आठवणीत राहतात. (De Dhakka) या चित्रपटातील हे गाणं त्यापैकीच एक आहे. या गाण्यावर नाचणाऱ्या छोट्या मुलीने त्या काळात प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तिचा निरागस डान्स आणि गोड हावभाव यामुळे हे गाणं आजही सोशल मीडियावर वारंवार व्हायरल होताना दिसतं.

या गाण्यात दिसलेली ही बालकलाकार म्हणजे लहान वयातच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या गौरीने आपल्या अभिनय आणि डान्समुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली होती. मात्र खूप कमी वयातच काम सुरू केल्यामुळे तिने काही काळासाठी अभिनयातून ब्रेक घेतला आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.

गौरी आता मोठी झाली असून तिच्या लुकमध्येही मोठा बदल झालेला पाहायला मिळतो. (De Dhakka) काही दिवसांपूर्वी तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही नवे फोटो शेअर केले. हे फोटो समुद्रकिनाऱ्यावरचे असून त्यामध्ये तिचा अतिशय साधा पण आकर्षक अंदाज पाहायला मिळतो.

या फोटोंमध्ये गौरीने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला असून तिचा कॅज्युअल बीच लुक खूपच स्टायलिश दिसत आहे. साधेपणातही आकर्षक वाटणाऱ्या तिच्या या लुकने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचे हे फोटो पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांना विश्वास बसत नाही की हीच ती लहान मुलगी आहे जिने “उगवली शुक्राची चांदणी” या गाण्यावर मनमोहक डान्स केला होता. (De Dhakka) आता ती अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि स्टायलिश दिसत असून तिच्या या नव्या लुकचे चाहते मोठ्या प्रमाणावर कौतुक करत आहेत.

गौरीचा हा साधा पण स्टायलिश बीच लुक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. चाहत्यांनी तिच्या फॅशन सेन्सचे आणि नैसर्गिक सौंदर्याचे भरभरून कौतुक करत तिच्या आगामी कामांची उत्सुकता व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

लग्न अर्जुनचं पण चर्चा मात्र सारा तेंडुलकरची, गुलाबी साडीतील सुंदर फोटोंची तुफान चर्चा!

हे 3 साप मेल्यानंतरही माणसाला चावू शकतात, आहेत अत्यंत विषारी, यातील दोन साप तर तुमच्या परिसरात नेहमी दिसतात

वीज बिल कमी आणि वीज वाचण्यासाठी खास ट्रिक्स.. झोपण्यापूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *