पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनविभागाच्या हद्दीत वाढत चाललेल्या मानव-बिबट्या (conflict) संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्यांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आज, ७ मार्च रोजी पहिल्या टप्प्यात २० बिबट्यांना गुजरातमधील वनतारा केंद्रात हलविण्यात आले आहे.

जुन्नर आणि शिरूर (conflict) तालुक्यातील काही भागांत बिबट्यांची हालचाल वाढल्याने मानव-बिबट्या संघर्षाच्या घटना सातत्याने समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर वनविभागाने काही बिबट्यांना पकडून त्यांना जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात ठेवले होते. मात्र या केंद्राची क्षमता केवळ ५० बिबट्यांपर्यंत मर्यादित असल्याने अतिरिक्त बिबट्यांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करणे आवश्यक झाले होते. यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला २० डिसेंबर २०२५ रोजी मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या निर्णयानुसार गुजरातमधील ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड (conflict) रिहॅबिलिटेशन सेंटर, वनतारा येथील २५ सदस्यीय पथक ६ मार्च रोजी जुन्नर येथे दाखल झाले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली बिबट्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर आज पहिल्या टप्प्यात १० नर आणि १० मादी अशा एकूण २० बिबट्यांना विशेष वातानुकूलित आणि सुसज्ज रेस्क्यू व्हॅनद्वारे सुरक्षितपणे वनतारा केंद्राकडे रवाना करण्यात आले.
ही संपूर्ण प्रक्रिया (conflict) वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये जुन्नर वनविभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह वाइल्डलाइफ SOS या संस्थेचेही सहकार्य लाभले. मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी वनविभाग विविध उपाययोजना राबवत असून नागरिकांनीही सतर्कता बाळगून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नगर आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अलीकडच्या (conflict) काळात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. विशेषतः ऊसाच्या शेतांमध्ये बिबटे प्रजनन करत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या भागात बिबट्यांची संख्या वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना अनेकदा रात्री शेतात जाऊन पाणी द्यावे लागते. त्या वेळी बिबट्यांचा सामना होण्याची शक्यता अधिक असते आणि अशा प्रसंगी हल्ल्यांच्या घटना घडत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे वाढत्या बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण कसे आणायचे आणि मानव-बिबट्या संघर्ष कसा कमी करायचा, हा प्रश्न सध्या प्रशासनासमोर मोठ्या आव्हानाच्या स्वरूपात उभा आहे.
हेही वाचा :
लग्न अर्जुनचं पण चर्चा मात्र सारा तेंडुलकरची, गुलाबी साडीतील सुंदर फोटोंची तुफान चर्चा!
वीज बिल कमी आणि वीज वाचण्यासाठी खास ट्रिक्स.. झोपण्यापूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी