टी20 वर्ल्डकप 2026 च्या अंतिम सामन्यापूर्वी क्रिकेटविश्वात अनेक समीकरणं आणि आकडेवारी चर्चेत आहेत. काही गोष्टी भारताच्या बाजूने जाताना दिसत आहेत, तर काही न्यूझीलंडसाठी आशादायक मानल्या जात आहेत. (T20 World Cup) अशाच एका खास आकडेवारीमुळे भारतीय फलंदाज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

8 मार्च रोजी अहमदाबादमधील येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेत दमदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे या निर्णायक सामन्यात कोण बाजी मारणार याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.उपांत्य फेरीतील करो या मरोच्या सामन्यात याने भारतासाठी झुंजार खेळी करत महत्त्वाची भूमिका बजावली. (T20 World Cup) त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाला विजय मिळवता आला आणि संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. या खेळीमुळे सॅमसनवर चाहत्यांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.
सॅमसनच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीकडे पाहिल्यास त्याने आतापर्यंत 61 सामन्यांतील 53 डावांमध्ये 3 शतकांसह 1310 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 25 पेक्षा जास्त धावा केलेल्या 16 डावांमध्ये भारतीय संघाला विजय मिळाल्याची नोंद आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात सॅमसनने किमान 26 धावा केल्या तर भारताच्या विजयाची शक्यता अधिक असल्याची चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली आहे.
या टी20 वर्ल्डकपमध्येही सॅमसनने जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. स्पर्धेत त्याने चार सामन्यांत 77 पेक्षा जास्त सरासरी आणि 201 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटसह 232 धावा केल्या आहेत. आक्रमक फलंदाजी करताना त्याने 16 षटकारही ठोकले आहेत. एखाद्या भारतीय फलंदाजाने एका वर्ल्डकपमध्ये मारलेले हे सर्वाधिक षटकार ठरले आहेत. (T20 World Cup) याआधी हा विक्रम याच्या नावावर होता.आता अंतिम सामन्यात सॅमसन पुन्हा अशीच धडाकेबाज खेळी करतो का आणि त्याच्या बॅटमधून निघालेल्या धावा भारताला विजेतेपद मिळवून देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
लग्न अर्जुनचं पण चर्चा मात्र सारा तेंडुलकरची, गुलाबी साडीतील सुंदर फोटोंची तुफान चर्चा!
वीज बिल कमी आणि वीज वाचण्यासाठी खास ट्रिक्स.. झोपण्यापूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी