केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या UPSC Civil Services Examination 2025 (UPSC) चा अंतिम निकाल जाहीर झाला असून देशभरातून अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. यंदाच्या निकालात Anuj Agnihotri यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावत अव्वल स्थान मिळवले आहे. त्यांच्या पाठोपाठ Rajeshwari Suve M यांनी दुसरा तर Akanksha Dhool यांनी तिसरा क्रमांक मिळवत यश संपादन केले. या वर्षी एकूण 958 उमेदवारांनी ही प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण केली असून देशभरातून त्यांच्या यशाचे कौतुक होत आहे.

या निकालात महाराष्ट्रालाही अभिमान (UPSC) वाटावा असे यश मिळाले आहे. Mitki या छोट्या गावातील प्रवीण कोळपे यांनी देशात 584 वा क्रमांक मिळवत सिव्हिल सेवा परीक्षेत यश मिळवले आहे. Atpadi तालुक्यातील शेतकरी कुटुंबात वाढलेल्या प्रवीण यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून हा प्रवास पूर्ण केला. सहाव्या प्रयत्नात त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण करत अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले.

प्रवीण यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. लहानपणीच वडिलांचे (UPSC) छत्र हरपल्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट आले होते. अशा वेळी त्यांच्या आईने शेतात मोलमजुरी करत मुलाच्या शिक्षणासाठी मोठे कष्ट घेतले. आईच्या मेहनतीला आणि प्रोत्साहनाला न्याय देत प्रवीण यांनी अखेर युपीएससीचे शिखर सर केले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे आणि गावकऱ्यांचे स्वप्नही पूर्ण झाले आहे.

प्रवीण यांच्या या यशानंतर गावात (UPSC) आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नातेवाईक, मित्र आणि ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. प्रवीण यांची आई आणि आजी यांनाही या यशाचा प्रचंड अभिमान वाटत आहे. नातू अधिकारी झाल्याचा आनंद व्यक्त करत आता त्याच्या लाल दिव्याच्या गाडीतून फिरायचे स्वप्न पूर्ण व्हावे अशी भावना त्यांच्या आजींनी व्यक्त केली.

जगातील सर्वात कठीण आणि स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक मानली जाणारी UPSC Civil Services Examination उत्तीर्ण होण्यासाठी प्रचंड परिश्रम, सातत्य आणि चिकाटी आवश्यक असते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून प्रवीण यांनी मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विशेषतः ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या आणि अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवीण कोळपे यांचा संघर्ष आणि यशाचा प्रवास नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे.

हेही वाचा :

लग्न अर्जुनचं पण चर्चा मात्र सारा तेंडुलकरची, गुलाबी साडीतील सुंदर फोटोंची तुफान चर्चा!

हे 3 साप मेल्यानंतरही माणसाला चावू शकतात, आहेत अत्यंत विषारी, यातील दोन साप तर तुमच्या परिसरात नेहमी दिसतात

वीज बिल कमी आणि वीज वाचण्यासाठी खास ट्रिक्स.. झोपण्यापूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *