सनातन धर्मात एकादशीला अत्यंत पवित्र व महत्त्वाचे व्रत मानले जाते. हे (Ekadashi) व्रत भगवान विष्णूंना समर्पित असून भक्त श्रद्धेने उपवास करून त्यांची पूजा करतात. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. एक कृष्ण पक्षात तर दुसरी शुक्ल पक्षात असते. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केल्यास व्यक्तीच्या पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते.

हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील (Ekadashi) कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 14 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी सुरू होईल आणि 15 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीचा विचार करता पापमोचनी एकादशीचे व्रत 15 मार्च रोजी पाळले जाणार आहे. या व्रताचा पारणा म्हणजे उपवास सोडण्याची वेळ 16 मार्च 2026 रोजी सकाळी 6 वाजून 30 मिनिटांपासून ते 8 वाजून 54 मिनिटांपर्यंत असेल.
पापमोचनी एकादशीच्या दिवशी भक्त सकाळी लवकर उठून स्नान करून दिवसाची (Ekadashi) सुरुवात करतात. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य देऊन भगवान विष्णूंचे ध्यान केले जाते आणि उपवास करण्याचा संकल्प केला जातो. घरातील देव्हाऱ्यात भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित करून गंगाजल, फुले, फळे, चंदन, हळद, अगरबत्ती, दिवा आणि मिठाई अर्पण केली जाते. पूजेच्या वेळी विष्णू मंत्रांचा जप केला जातो आणि पापमोचनी एकादशीची कथा वाचली जाते. शेवटी भगवान विष्णूंची आरती करून पूजा पूर्ण केली जाते.
धार्मिक श्रद्धेनुसार पापमोचनी (Ekadashi) एकादशीचे व्रत अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या दिवशी केलेल्या उपवास आणि पूजेच्या पुण्यामुळे जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. भगवान विष्णूंची कृपा प्राप्त झाल्याने जीवनात सुख, सौभाग्य आणि समृद्धी येते. तसेच या व्रताचे पुण्य मृत्युनंतर मोक्ष प्राप्त करण्यास मदत करते, असेही धर्मग्रंथांमध्ये सांगितले जाते. त्यामुळे अनेक भक्त श्रद्धेने पापमोचनी एकादशीचे व्रत पाळतात.
हेही वाचा :
लग्न अर्जुनचं पण चर्चा मात्र सारा तेंडुलकरची, गुलाबी साडीतील सुंदर फोटोंची तुफान चर्चा!
वीज बिल कमी आणि वीज वाचण्यासाठी खास ट्रिक्स.. झोपण्यापूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी