अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा एका लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक हे चक्क सलमान खानच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

बॉलिवूड इंडस्ट्रीत अशा अनेक जोड्या आहेत, ज्या कधी काळी विभक्त झाल्या असल्या किंवा त्यांच्या ब्रेकअपला कितीही वर्षे झाली तरी चाहत्यांमध्ये त्या कायम चर्चेत असतात. अशीच एक जोडी म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय. या दोघांची लव्ह-स्टोरी, त्यांची भांडणं आणि ब्रेकअप जगजाहीर आहे. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं आणि या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. तर दुसरीकडे सलमान आजही सिंगलच आहे. आता पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे ऐश्वर्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ. नुकत्याच एका लग्नसमारंभात ऐश्वर्या तिच्या पतीसोबत पोहोचली होती. (Abhishek Bachchan) यावेळी दोघांनी स्टेजवर धमाल डान्ससुद्धा केला. याच डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्यामागचं कारण म्हणजे या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक हे चक्क सलमान खानच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

ऐश्वर्याने या लग्नसोहळ्यात निळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे, तर अभिषेकनेही निळ्या आणि पांढऱ्या रंगसंगतीचा कुर्ता पायजमा घातला आहे. लग्नसोहळ्यात ऐश्वर्या आणि अभिषेक हे ‘सलाम-ए-इश्क’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हे सलमान खानच्या ‘सलाम-ए-इश्क’ या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं आहे. मुदित अदानी आणि अनन्या दिवांजी यांच्या लग्नसोहळ्या ऐश्वर्या आणि अभिषेक नाचताना दिसले. त्यांच्यासोबत नीता अंबानी यांनीसुद्धा ठेका धरला होता.

सलाम-ए-इश्क हे गाणं शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाने संगीतबद्ध केलं असून या चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल अडवाणीने केलं आहे. तर समीर अंजान यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. (Abhishek Bachchan) या मल्टि स्टारर चित्रपटात सलमान खान, प्रियांका चोप्रा, अनिल कपूर, जुही चावला, गोविंदा, विद्या बालन, जॉन अब्राहम आणि शनॉन इस्रा यांच्या भूमिका आहेत.

याआधी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या लग्नातही ऐश्वर्या-अभिषेकच्या एण्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंढोकच्या लग्नसोहळ्यात ऐश्वर्याने निळ्या रंगाचा भरजरी सूट परिधान केला होता. (Abhishek Bachchan) तर अभिषेकने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा लांब सूट घातला होता. गाडीमधून उतरताच या दोघांनी पापाराझींसमोर फोटो आणि व्हिडीओसाठी पोझ दिले आणि त्यानंतर हातात हात घालून ते कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी पुढे निघून गेले.

हेही वाचा :

ही’ FD ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम, 8.10 टक्के दराने परतावा, जाणून घ्या

अखेर इराणची माघार, केली सर्वात मोठी घोषणा, जगाला मोठा दिलासा

पश्चिम बंगालच्या सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या, राष्ट्रपतींच्या अपमानावरून PM मोदींची TMC सरकारवर टीका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *