२०२७ मधील सूर्यग्रहण शतकातील दुसरी सर्वात मोठी खगोलीय घटना असेल. २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या ग्रहणात सूर्य सुमारे ६ मिनिटे २२ सेकंद झाकला जाईल, ज्यामुळे दिवसा रात्रीसारखा अंधार होईल. भारतात ते अंशतः दिसेल, तर ११ देशांत पूर्णपणे. ही दुर्मिळ घटना २११४ पर्यंत पुन्हा दिसणार नाही, त्यामुळे तिचे विशेष महत्त्व आहे.

धार्मिक दृष्टीने पाहिलं तर सूर्य ग्रहण अशुभ मानलं जातं. पण खगोलशास्त्रानुसार ही एक अनोखी, दुर्लभ घटना मानली जाते. जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, सूर्याच्या किरणांना पृथ्वीवर पोहोचण्यापासून रोखतो आणि पृथ्वीवर चंद्राची सावली पडते, तेव्हा असे मानले जाते की सूर्यग्रहण लागलं आहे. सूर्यग्रहणाची खगोलीय घटना नेहमीच अमावस्येच्या दिवशी घडते.

2026 मध्ये 17 फेब्रुवारी रोजी सूर्यग्रहण झालं आहे. तर या वर्षी दुसरे सूर्यग्रहणही होणार असून ते 12 ऑगस्ट रोजी असेल. (sun) परंतु खगोलशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी 2027 या वर्षावर लक्ष ठेवून आहेत. २०२७ हे वर्ष शतकातील सर्वात महत्त्वाच्या आणि दुर्मिळ घटनांपैकी एकाचे साक्षीदार असेल. या वर्षीचे सूर्यग्रहण शतकातील दुसरे सर्वात मोठे सूर्यग्रहण असेल.

2027 मध्ये होणारे हे शतकातील दुसरे सर्वात मोठे सूर्यग्रहण असून ते 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्या दिवशी चंद्र सूर्याला जवळजवळ 6 मिनिटं 22 सेकंदांसाठी पूर्णपणे झाकून टाकेल.(sun) जेव्हा हे घडेल तेव्हा दिवसा रात्रीसारखा काळाकुट्ट अंधार होईल. इतक्या दीर्घ कालावधीचे असे दृश्य 2114 मध्येच पुन्हा दिसणार आहे. म्हणूनच पुढचं होणारं हे सूर्यग्रहण, एक अतिशय खास खगोलीय घटना मानली जाते.

पण हे सूर्यग्रहण भारतात पूर्णपणे दिसणार नाही, मात्र अंशतः दिसेल. असं असलं तरी जगातील 11 देशांमध्ये ते पूर्णपणे दिसेल, ज्यामध्ये प्रामुख्याने स्पेन, इजिप्त, सौदी अरेबिया, लिबिया, ट्युनिशिया, येमेन, मोरोक्को, सुदान, सोमालिया, अल्जेरिया आणि जिब्राल्टर या देशांचा समावेश आहे. समावेश आहे.(sun) यापूर्वी 21 व्या शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण हे अनेक वर्षांपूर्वी म्हणजे, 22 जुलै 2009 रोजी झाले. या ग्रहणाचा कालावधी 6 मिनिटं आणि 39 सेकंद इतका होता. तर आता पुढल्या वर्षी म्हणजे 027 मध्ये होणार सूर्यग्रहण हे या शतकातलं सर्वात मोठं सूर्यग्रहण असेल.

हेही वाचा :

उन्हाळ्यात चेहरा धुण्यासाठी वापरा 5 गोष्टी, त्वचा काचेसारखी होईल चमकदार

गृहकर्जासोबत Home Loan Insurance घेणे किती महत्वाचे? जाणून घ्या

तुम्हाला क्रेडिट कार्ड, बँकेकडून कर्ज मिळत नाही का? ‘या’ टिप्स जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *