Iran आणि Israel यांच्यात सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता (ongoing tension) भारतातही जाणवू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर गॅस टंचाईबाबत अनेक दावे केले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. काही शहरांमध्ये गॅस एजन्सीसमोर रांगा लागल्याचेही चित्र दिसून येत आहे. लोकांनी घाईघाईने सिलिंडर बुक करण्यास सुरुवात केल्यामुळे वातावरणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर Hindustan Petroleum Corporation Limited अर्थात HPCL ने ग्राहकांना मेसेजद्वारे महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने सांगितले की देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या टंचाईच्या बातम्या निराधार आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक बुकिंग करू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. इंधनाचा वापर नेहमीप्रमाणे समजूतदारपणे करणेच योग्य असल्याचे कंपनीने नमूद केले.
दरम्यान केंद्र सरकारनेही परिस्थिती लक्षात (ongoing tension) घेऊन गॅस वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या उपलब्धतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने Essential Commodities Act, 1955 लागू केला आहे. या कायद्यामुळे एलपीजी गॅसचा पुरवठा, साठा आणि वितरण यावर नियंत्रण ठेवणे सोपे होणार असून साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करणेही शक्य होणार आहे. घरगुती एलपीजी, पीएनजी तसेच वाहतुकीसाठी लागणाऱ्या सीएनजीला प्राधान्याने पुरवठा केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
युद्धाच्या (ongoing tension) पार्श्वभूमीवर गॅस वितरणाचे नियोजन तीनही कंपन्यांकडून करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमातही बदल करण्यात आला आहे. आता पहिला सिलिंडर मिळाल्यानंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी २५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जर ग्राहकांनी यापूर्वी मोबाईलवरून बुकिंग करण्याचा प्रयत्न केला तर ते स्वीकारले जाणार नाही आणि कंपनीकडून २५ दिवसांनंतरच बुकिंग करण्याचा संदेश पाठवला जाईल.
सरकार आणि गॅस कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या देशात इंधनाचा (ongoing tension) पुरेसा साठा आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा आणि अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा :
उन्हाळ्यात चेहरा धुण्यासाठी वापरा 5 गोष्टी, त्वचा काचेसारखी होईल चमकदार
गृहकर्जासोबत Home Loan Insurance घेणे किती महत्वाचे? जाणून घ्या
तुम्हाला क्रेडिट कार्ड, बँकेकडून कर्ज मिळत नाही का? ‘या’ टिप्स जाणून घ्या