क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. Yes Bank ने आपल्या क्रेडिट (major changes) कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल जाहीर केले असून हे नवे नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत. त्यामुळे येस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांनी हे बदल समजून घेणे आवश्यक आहे. बँकेने विशेषत: युटिलिटी बिल पेमेंट, वाहतूक व्यवहार आणि थर्ड-पार्टी डिजिटल वॉलेटमध्ये पैसे लोड करण्यासंबंधी काही मर्यादा वाढवल्या आहेत.

नवीन नियमांनुसार, वीज, पाणी, गॅस, इंटरनेट यांसारखी (major changes) युटिलिटी बिले क्रेडिट कार्डने भरल्यास त्यावर “युटिलिटी सर्व्हिस ट्रान्झॅक्शन फी” लागू होऊ शकते. मात्र बँकेने आता या शुल्काची मर्यादा वाढवली आहे. म्हणजेच, पूर्वीपेक्षा जास्त खर्च झाल्यानंतरच हे शुल्क आकारले जाईल. येस प्रायव्हेट क्रेडिट कार्डसाठी ही मर्यादा आता 1 लाख रुपये करण्यात आली आहे, जी आधी 50 हजार रुपये होती. तसेच मार्की आणि रिझर्व क्रेडिट कार्डसाठी ही मर्यादा 50 हजार रुपये करण्यात आली आहे, जी पूर्वी 25 हजार रुपये होती. इतर रिटेल क्रेडिट कार्डसाठी ही मर्यादा 25 हजार रुपये करण्यात आली असून यापूर्वी ती 15 हजार रुपये होती.
वाहतूक व्यवहारांबाबतही बँकेने काही बदल केले (major changes) आहेत. टोल किंवा ब्रिज पेमेंटसारखे व्यवहार आता क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये “ट्रान्सपोर्टेशन फी” या नावाने दिसतील. येस प्रायव्हेट, मार्की आणि रिझर्व क्रेडिट कार्डसाठी वाहतूक व्यवहारांची मर्यादा आता 75 हजार रुपये करण्यात आली आहे, जी आधी 50 हजार रुपये होती. तर इतर रिटेल क्रेडिट कार्डसाठी ही मर्यादा 50 हजार रुपये करण्यात आली असून ती आधी 25 हजार रुपये होती.
याशिवाय थर्ड-पार्टी डिजिटल वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याबाबतही नवीन नियम लागू करण्यात (major changes) आले आहेत. जर ग्राहकांनी क्रेडिट कार्डचा वापर करून Amazon Pay, Paytm, Mobikwik किंवा CRED सारख्या प्लॅटफॉर्मवर पैसे लोड केले तर त्यावर काही शुल्क लागू होऊ शकते. नवीन नियमानुसार 2 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र 2 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर 1 टक्के शुल्क आकारले जाईल. एका व्यवहारावर आकारले जाणारे कमाल शुल्क 5 हजार रुपयांपेक्षा जास्त असणार नाही.
या बदलांमुळे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना काही व्यवहारांमध्ये अधिक स्पष्टता मिळणार असली तरी काही परिस्थितीत अतिरिक्त शुल्कही लागू होऊ शकते. त्यामुळे 1 एप्रिल 2026 पासून लागू होणाऱ्या या नवीन नियमांची माहिती आधीच घेणे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
हेही वाचा :
उन्हाळ्यात चेहरा धुण्यासाठी वापरा 5 गोष्टी, त्वचा काचेसारखी होईल चमकदार
गृहकर्जासोबत Home Loan Insurance घेणे किती महत्वाचे? जाणून घ्या
तुम्हाला क्रेडिट कार्ड, बँकेकडून कर्ज मिळत नाही का? ‘या’ टिप्स जाणून घ्या