अमेरिका आणि इराण युद्धाचा आज 10 वा दिवस आहे. भयंकर हल्ले केले जात आहेत. त्यामध्येच जगाकडून युद्ध कधी थांबणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. जवळपास जगातील सर्वच देशांना या युद्धाचा फटका बसताना दिसत आहे.

अमेरिका आणि इस्त्रायल युद्धाला 10 दिवस पूर्ण झाली आहेत. यादरम्यान धक्कादायक बॉम्ब हल्ले केले जात आहेत. या युद्धाचा सर्वात जास्त भयंकर परिणाम इराणच्या तेहरानमध्ये बघायला मिळत आहे. भीषण हल्ले तेहरानमध्ये करण्यात आली. तेल डेपोला टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. आखाती देशांचेही या युद्धाने मोठे नुकसान झाले. आखाती देशांच्या तेल रिफायनरीवर बॉम्ब हल्ले करण्यात आली. (question) याचा परिणाम सध्याच्या घडीला इतका जास्त घातक झाला की, जगात तेलाचा तुडवडा निर्माण झाला. हेच नाही तर कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सातत्याने मोठी वाढ होताना दिसत आहे. गॅसची मोठी टंचाईही निर्माण झाली. इराण अमेरिका युद्ध पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. मात्र, युद्धाला 1o दिवस पूर्ण झालेली असतानाच अनेक देश संकटात आहेत.

दुबईवर सातत्याने मोठे हल्ले केले जात आहेत. काही आखाती देशांचे म्हणणे आहे की, इस्त्रायलने आपल्या संघर्षात कारण नसतानाही अमेरिकेला उतरवले आणि त्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. अमेरिका इराण युद्ध नक्की किती दिवस सुरू राहणार यावर अत्यंत मोठे भाष्य आता करण्यात आले. थेट त्यांच्याकडून प्लॅनच सांगून टाकला.

28 फेब्रुवारीला इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून मोठा हल्ला इराणवर केला. आता दहा दिवस या युद्धाला पूर्ण झाली असतानाच युद्ध कधी थांबवणार हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. (question) यापूर्वी अमेरिकेने यावर भाष्य केले होते, आता पुन्हा मोठे विधान करण्यात आले. इराणविरोधातील युद्ध संपवण्याचा निर्णय इस्त्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांच्यासोबत चर्चा करून घेतला जाईल.

बिन्यामिन नेतान्याहू नसते तर इराणचा नाश केला असता असे थेट मोठे विधान डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितले की, इराणविरोधातील युद्ध थांबवण्याचा निर्णय परस्पर समंतीने घेतला जाईल. आज युद्धाचा दहा दिवस असून सतत हल्ले सुरू आहेत. (question) फक्त इराण, इस्त्रायलच नाही तर आखाती देशांवरही हल्ले केले जात आहेत. सध्या जगातील अनेक देशांकडून हे युद्ध थांबवण्याकरिता प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा :

ही’ FD ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम, 8.10 टक्के दराने परतावा, जाणून घ्या

अखेर इराणची माघार, केली सर्वात मोठी घोषणा, जगाला मोठा दिलासा

पश्चिम बंगालच्या सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या, राष्ट्रपतींच्या अपमानावरून PM मोदींची TMC सरकारवर टीका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *