धमन्या ब्लॉक होणं ही समस्या हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारख्या गंभीर (serious diseases) आजारांशी थेट संबंधित असते. शरीरातील धमन्या अरुंद होणे किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण होणे यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि त्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र अनेकदा शरीर आधीच काही संकेत देत असते. विशेष म्हणजे हातांमध्ये दिसणारी काही लक्षणं धमन्या ब्लॉक होण्याची सुरुवातीची चिन्हं असू शकतात. ही लक्षणं वेळीच ओळखली तर मोठा धोका टाळता येऊ शकतो.धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ लागल्यास काही लोकांना अचानक एका हातात तीव्र वेदना जाणवू शकतात. ही वेदना टोचल्यासारखी किंवा दाबल्यासारखी वाटू शकते. अनेकदा ही वेदना एकाच हातात जाणवते आणि त्यासोबत हात सुन्न होणं किंवा मुंग्या येणं अशी समस्या देखील दिसू शकते. काही प्रकरणांमध्ये ही स्थिती ‘क्रिटिकल लिंब इस्केमिया’ नावाच्या गंभीर अवस्थेचे लक्षण असू शकते. या अवस्थेत त्या भागातील रक्तप्रवाह अचानक कमी होतो किंवा थांबतो.

धमन्या ब्लॉक झाल्यानंतर (serious diseases) त्वचेच्या रंगातही बदल दिसून येऊ शकतो. हा बदल प्रामुख्याने बोटांमध्ये जाणवतो. काही वेळा बोटांचा रंग निळसर, पांढरा किंवा जांभळा दिसू शकतो. रक्तप्रवाह योग्य प्रकारे न झाल्यामुळे ही समस्या निर्माण होते. काही प्रकरणांमध्ये ही स्थिती परिफेरल आर्टरी डिसीजशी संबंधित असू शकते आणि यालाच वैद्यकीय भाषेत अ‍ॅक्रोस्यानोसिस असं म्हटलं जातं.काही लोकांना हातात गोळे येण्याची किंवा हात जड झाल्यासारखं वाटण्याची समस्या देखील जाणवू शकते. वैद्यकीय भाषेत याला क्लॉडिकेशन असं म्हटलं जातं. धमन्यांमध्ये प्लॅक साचल्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि स्नायूंना पुरेसा ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा मिळत नाही. त्यामुळे हातात वेदना, गोळे येणं किंवा जडपणा जाणवू शकतो.

याशिवाय धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास नखांच्या वाढीवरही (serious diseases) परिणाम होऊ शकतो. रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे शरीराच्या काही भागांपर्यंत आवश्यक पोषण पोहोचत नाही. त्यामुळे हातांची नखं हळू वाढू लागतात किंवा ती सहज तुटू शकतात. काही गंभीर परिस्थितीत नखांची वाढ पूर्णपणे थांबण्याची शक्यताही असते.अशा प्रकारची लक्षणं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर आरोग्यदायी जीवनशैलीही तितकीच आवश्यक आहे. धूम्रपान टाळणं, नियमित व्यायाम करणं आणि संतुलित व पौष्टिक आहार घेणं यामुळे धमन्या निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते.

टीप : वरील माहिती सामान्य जागरूकतेसाठी देण्यात आलेली आहे. कोणतेही उपचार, आहार किंवा औषधं घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

हेही वाचा :

उन्हाळ्यात चेहरा धुण्यासाठी वापरा 5 गोष्टी, त्वचा काचेसारखी होईल चमकदार

गृहकर्जासोबत Home Loan Insurance घेणे किती महत्वाचे? जाणून घ्या

तुम्हाला क्रेडिट कार्ड, बँकेकडून कर्ज मिळत नाही का? ‘या’ टिप्स जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *