Rakesh Bapat सध्या Bigg Boss Marathi च्या घरात आपला खेळ दाखवत (Bigg Boss Marathi) प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘एजे’ या भूमिकेमुळे Navri Mile Hitlerla या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या राकेशचा प्रवास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याआधी त्याने Bigg Boss OTT आणि हिंदी बिग बॉसमध्येही सहभाग घेतला होता. आता मराठी बिग बॉसच्या घरात तो शांत, संयमी पण ठाम खेळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, राकेशची (Bigg Boss Marathi) पूर्व पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री Ridhee Dogra हिने नुकत्याच इन्स्टाग्रामवरील ‘Ask Me Anything’ सेशनमध्ये राकेशबद्दल मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली. चाहत्यांनी तिला राकेशच्या बिग बॉस प्रवासाबद्दल विचारले असता तिने त्याच्यावर अभिमान असल्याचे सांगितले. राकेश पुन्हा बिग बॉसच्या घरात जात असल्याने सुरुवातीला थोडी चिंता वाटत होती, मात्र यावेळी तो अतिशय छान खेळ करत असल्याचे तिने नमूद केले.

रिधीने सांगितले की, बिग बॉसच्या घरात दिसणारा राकेश अगदी (Bigg Boss Marathi) तसाच आहे, जसा तो खऱ्या आयुष्यात आहे. तो स्वतःच्या नियमांनुसार खेळ खेळत असल्याचा तिला आनंद असल्याचेही तिने स्पष्ट केले. तसेच तिने त्याला शुभेच्छा देत आपण कायम त्याच्यासाठी ‘चिअर’ करत राहणार असल्याचेही सांगितले.
राकेश आणि रिधी यांचे नाते संपले असले तरी त्यांच्यातील मैत्री आजही कायम आहे. एका मुलाखतीत रिधीने सांगितले होते की, राकेश तिचा पूर्व पती असला तरी तो आजही तिच्या सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक आहे. एखादी अडचण आली तर ती त्याची मदत घेते, असेही तिने सांगितले होते.

राकेश बापट आणि रिधी डोग्रा यांनी 2019 मध्ये लग्न केले होते. एका (Bigg Boss Marathi) मालिकेच्या सेटवर त्यांची ओळख झाली आणि त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही वर्षांनंतर दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. नात्यातील बदलांनंतरही त्यांनी एकमेकांविषयी आदर आणि मैत्री कायम ठेवली आहे.
सध्या बिग बॉस मराठीच्या घरात राकेश बापटचा खेळ आणि त्याला मिळणारा माजी पत्नीचा पाठिंबा या दोन्ही गोष्टी प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.

हेही वाचा :

उन्हाळ्यात चेहरा धुण्यासाठी वापरा 5 गोष्टी, त्वचा काचेसारखी होईल चमकदार

गृहकर्जासोबत Home Loan Insurance घेणे किती महत्वाचे? जाणून घ्या

तुम्हाला क्रेडिट कार्ड, बँकेकडून कर्ज मिळत नाही का? ‘या’ टिप्स जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *