Indian Premier League 2026 च्या हंगामाबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता (excitement) शिगेला पोहोचली आहे. आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र स्पर्धेचं अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर झालेलं नाही. दरम्यान, या हंगामात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून सामन्यांची संख्या वाढण्याची चर्चा जोरात सुरू आहे.

सध्या आयपीएलमध्ये (excitement) एकूण 10 संघ सहभागी होतात आणि प्रत्येक संघ साखळी फेरीत 14 सामने खेळतो. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत 74 सामने खेळवले जात होते. मात्र यंदाच्या हंगामात ही संख्या वाढून 84 सामन्यांपर्यंत जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. याचा अर्थ प्रत्येक फ्रेंचायझीला साखळी फेरीत 16 सामने खेळावे लागू शकतात.
याआधीही सामन्यांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. 2025 आणि 2026 च्या हंगामात सामन्यांची संख्या 74 वरून 84 करण्याचा विचार झाला होता. मात्र मागील हंगामात काही कारणांमुळे हा प्रस्ताव अमलात आणता आला नव्हता. विशेषतः काही परदेशी खेळाडू उपलब्ध नसण्याची शक्यता असल्याने तेव्हा बीसीसीआयने 74 सामन्यांचंच वेळापत्रक कायम ठेवलं होतं.
मात्र आता मीडिया हक्क करार आणि प्रसारकांच्या मागणीमुळे यंदाच्या (excitement) हंगामात सामन्यांची संख्या वाढवण्याला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. ‘द फायनान्शियल एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, यंदा 10 अतिरिक्त सामने खेळवण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे आयपीएलच्या 2026 हंगामात प्रेक्षकांना अधिक सामने पाहण्याची संधी मिळू शकते.
इतकंच नव्हे तर पुढील वर्षी म्हणजे 2027 च्या हंगामात सामन्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्या वेळी स्पर्धेत तब्बल 94 सामने खेळवले जाऊ शकतात. जर तसं झालं तर प्रत्येक संघाला साखळी फेरीत 18 सामने खेळावे लागतील. त्यापैकी नऊ सामने घरच्या मैदानावर आणि उर्वरित नऊ सामने प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर खेळले जातील.
दरम्यान, आयपीएलमध्ये (excitement) भविष्यात संघसंख्या वाढवण्याबाबतही चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. काही सोशल मीडियावरील चर्चांनुसार स्पर्धेत 12 संघ सहभागी होतील आणि दोन गटांमध्ये विभागून स्पर्धा खेळवली जाईल, अशी चर्चा रंगली आहे. मात्र या चर्चांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
एकूणच, आयपीएल 2026 चा हंगाम अधिक मोठा आणि रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. सामन्यांची संख्या वाढल्यास क्रिकेट चाहत्यांना अधिक सामने आणि अधिक थरार अनुभवायला मिळणार आहे.
हेही वाचा :
उन्हाळ्यात चेहरा धुण्यासाठी वापरा 5 गोष्टी, त्वचा काचेसारखी होईल चमकदार
गृहकर्जासोबत Home Loan Insurance घेणे किती महत्वाचे? जाणून घ्या
तुम्हाला क्रेडिट कार्ड, बँकेकडून कर्ज मिळत नाही का? ‘या’ टिप्स जाणून घ्या