भारतीय क्रिकेटमध्ये मोठा वाटा उचललेल्या काही खेळाडूंची नावे चर्चेत (announcement) असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2026 साठीच्या नमन पुरस्कारांची घोषणा केली आहे. 15 मार्च रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या या सोहळ्यात अनेक खेळाडूंना गौरविण्यात येणार आहे. मात्र निवृत्ती जाहीर केलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नावांचा उल्लेख नसल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.भारतीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडू, प्रशिक्षक आणि पंचांना दरवर्षी नमन पुरस्कारांद्वारे गौरविले जाते. 2026 साठीचा हा कार्यक्रम 15 मार्च रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याला पुरुषांमधील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठी दिला जाणारा पॉली उमरीगर पुरस्कार मिळणार आहे. विशेष म्हणजे गिलला हा सन्मान सलग दुसऱ्यांदा मिळत आहे.

महिलांच्या गटात स्मृती मंधाना हिला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला (announcement) क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तिच्या कारकिर्दीत हा पाचव्यांदा मिळणारा सन्मान ठरणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईच्या ईरा जाधव हिला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी जगमोहन दलमिया ट्रॉफी मिळणार आहे. तर हरियाणाच्या शेफाली वर्मा हिला वरिष्ठ महिला एकदिवसीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल याच ट्रॉफीने गौरवण्यात येईल.

पुरुषांच्या देशांतर्गत स्पर्धांमधील कामगिरीचा गौरवही या पुरस्कारांमध्ये होणार आहे.(announcement) मुंबईचा आयुष म्हात्रे याला मर्यादित षटकांच्या देशांतर्गत स्पर्धेत सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूसाठी लाला अमरनाथ पुरस्कार मिळणार आहे. तसेच विदर्भाच्या हर्ष दुबे याला रणजी ट्रॉफीमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून हाच पुरस्कार दिला जाईल.याशिवाय मुंबई क्रिकेट असोसिएशन ला देशांतर्गत स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संघटनेचा पुरस्कार मिळणार आहे. कारण मुंबईने या हंगामात चार स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवले असून दोन स्पर्धांमध्ये उपविजेतेपद पटकावले आहे. नमन पुरस्कार सोहळ्यात भारतीय संघांनी जिंकलेल्या पाच आयसीसी स्पर्धांमधील विजेत्या संघांचाही विशेष सन्मान केला जाणार आहे. यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026, आयसीसी महिला वर्ल्ड कप 2025, पुरुष अंडर-19 वर्ल्ड कप 2026 आणि महिला अंडर-19 वर्ल्ड कप 2025 या स्पर्धांचा समावेश आहे.

हेही वाचा :

इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात

सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा

सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *