माजी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या विमान अपघात आणि मृत्यूबाबत (Jay Pawar) अनेक शंका उपस्थित होत असताना त्यांच्या पुत्र Jay Pawar यांनी पुन्हा एकदा या प्रकरणावर भाष्य केले आहे. डीजीसीएच्या प्राथमिक चौकशी अहवालाबाबत आपण समाधानी नसल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर ते लवकरच पत्रकार परिषद घेऊन अपघाताबाबत आणि अहवालात नमूद केलेल्या मुद्द्यांबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र ही पत्रकार परिषद अचानक पुढे ढकलल्यामुळे त्यांच्या वर कोणाचा दबाव आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता.

या दरम्यान जय पवार यांनी अपघातग्रस्त (Jay Pawar) विमानातील फ्लाइट अटेंडंट असलेल्या Pinky Mali यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणाबाबत भूमिका स्पष्ट केली. पिंकी माळी यांच्या आईशी आपली चर्चा झाली असून त्यांच्या कुटुंबावर मोठे दु:ख कोसळले असल्याचे त्यांनी सांगितले. असे दु:ख सहज विसरता येणार नाही, त्यामुळे आता सर्व कुटुंबीयांनी एकमेकांची काळजी घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पत्रकार परिषद पुढे ढकलण्याबाबत होत असलेल्या चर्चांनाही त्यांनी उत्तर दिले. माझ्यावर (Jay Pawar) कोणाचाही दबाव नाही, असे स्पष्ट सांगत त्यांनी या प्रकरणात अजून काही महत्त्वाची माहिती मिळवणे आवश्यक असल्याचे म्हटले. पूर्ण सत्य समोर येण्यापूर्वी घाईघाईने कोणतेही विधान करण्यापेक्षा सगळी माहिती गोळा करूनच भूमिका मांडणे योग्य ठरेल, त्यामुळेच पत्रकार परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आमदार Rohit Pawar यांनीही पत्रकार (Jay Pawar) परिषद पुढे ढकलल्यामुळे काही दबाव असल्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र जय पवार यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देत योग्य वेळी सविस्तर माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे. पुढील आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन अपघात, चौकशी अहवाल आणि या प्रकरणातील सर्व शंकांवर आपण सविस्तर बोलणार असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

हेही वाचा :

युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान

वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या

कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *