एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे राज्यात अवकाळी (warning) पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने, पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमरावतीत राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. आज कोकणात उष्ण लाटेचा, तर येत्या १७ ते २० मार्च दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सलग तिसऱ्या दिवशीही अमरावती जिल्हा देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे.

आजही ४१.८ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. (warning) कमाल तापमान ४० अंशापार गेल्यास व तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते.दरम्यान आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोकण येथे उष्ण लाटेची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा (warning) व तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. १७ मार्च ते २० मार्च दरम्यान हा पाऊस पडणार असल्याचे म्हटले जात आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत.
हेही वाचा :
इराण–अमेरिका युद्धाचा फटका सामान्य जनतेला, हजारो कामगारांची नोकरी जाणार? गॅस टंचाईमुळे उद्योग संकटात
सावधान! LPG गॅस कनेक्शनच्या नावाखाली मोठा फ्रॉड, चार दिवसात सायबर भामट्यांचा नागरिकांना लाखोंचा गंडा
सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?