टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर आता भारतीय संघाचं (ODI World Cup) लक्ष थेट वनडे वर्ल्डकप 2027 कडे वळलं आहे. आगामी स्पर्धा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणार असल्याने संघरचना आणि रणनीती यावर आतापासूनच बारकाईने काम सुरू झालं आहे. विशेषतः त्या देशांतील खेळपट्ट्या आणि परिस्थिती लक्षात घेता वेगवान गोलंदाजांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

पीटीआयच्या (ODI World Cup) वृत्तानुसार, भारतीय निवड समितीने संभाव्य 20 खेळाडूंचा एक गट तयार केला असून या खेळाडूंची कसून चाचपणी आयपीएल 2026 दरम्यान केली जाणार आहे. या प्रक्रियेत खेळाडूंचा फॉर्म, फिटनेस आणि वर्कलोड मॅनेजमेंट या गोष्टींवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. या 20 जणांमधून अंतिम 15 खेळाडूंची निवड होणार असल्याने स्पर्धा अधिकच चुरशीची असणार आहे.
वेगवान गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांची (ODI World Cup) नावे जवळपास निश्चित मानली जात आहेत. त्यांच्यासोबत अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा हे गोलंदाजही शर्यतीत आहेत. मात्र, मागील वनडे वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमीला या योजनेत स्थान नसल्याचं समोर येत असल्याने हा निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे. अनुभवी खेळाडूला वगळण्यामागे फिटनेस आणि दीर्घकालीन नियोजन हे प्रमुख कारण मानलं जात आहे.
फलंदाजीच्या आघाडीवर कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. त्यांच्यासोबत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारखे अनुभवी खेळाडू संघाचा कणा मजबूत करतील. केएल राहुल आणि ऋषभ पंत हे यष्टिरक्षक म्हणून प्रमुख पर्याय असतील, तर इशान किशनही शर्यतीत कायम आहे.
अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक (ODI World Cup) पांड्यासोबत रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची नावे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादव महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. याशिवाय यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांसारखे तरुण खेळाडूही आपली छाप पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
आता आयपीएल 2026 ही स्पर्धा या सर्व खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. (ODI World Cup) प्रत्येक सामन्यातील कामगिरीवर त्यांचा वर्ल्डकपचा मार्ग ठरणार असल्याने ही निवड प्रक्रिया अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक असणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापन दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून संतुलित आणि सक्षम संघ उभा करण्याच्या प्रयत्नात आहे, जेणेकरून 2027 मध्येही भारत विजेतेपदाचा दावेदार राहील.
हेही वाचा :
राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गव्हावरील किमान आधारभूत किंमत वाढवली
मोठं संकट ओढावणार ! पेट्रोल-डिझेलचे दर ५० ते ६० रूपयांनी महागणार ?
हार्दिक कॅप्टन्सी सोडणार अन् सूर्याकडे MI ची धुरा ?