राज्यातील राजकारण पुन्हा (trouble)एकदा ढवळून निघालं आहे. नरहरी झिरवाळ हे नाव पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलं असून सोशल मीडियावर एका कथित व्हिडिओने मोठी खळबळ उडवली आहे. या व्हिडिओमध्ये झिरवाळ तृतीय पंथीय व्यक्तीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचा दावा केला जात आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हा व्हिडिओ नेमका कुठला, (trouble)कधीचा आणि त्यामागील सत्य काय आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत झिरवाळ यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे.दरम्यान, झिरवाळ किंवा त्यांच्या कार्यालयाकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
व्हिडिओची सत्यता तपासण्याची (trouble)मागणी होत असून, तो बनावट आहे की खरा याबाबत तपास यंत्रणांकडून चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या घटनेमुळे राजकीय वातावरण तापलं असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणावर आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.