भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने (repercussions) राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली असून, याचे पडसाद आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटले आहेत. या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे सोपवला असून, सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर (repercussions) चाकणकर यांच्यावर सातत्याने टीका होत होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटो आणि व्हिडिओंमुळे वाद अधिकच वाढला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी याआधीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र विरोधकांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायउतार होण्याची मागणी लावून धरली होती. अखेर वाढत्या दबावामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, चाकणकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भूमिकेचे (repercussions) स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अशोक खरात प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसून, त्याच्या आर्थिक व्यवहारांशी किंवा गैरकृत्यांशी आपण जोडलेलो नाही. तपासातून सत्य समोर येईल आणि आपली भूमिका योग्य ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. माध्यमांमधून कोणताही पुरावा नसताना होत असलेले आरोप वेदनादायक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून, तपास यंत्रणांकडून खरातची चौकशी केली जात आहे. त्याच्यावर महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर आरोप आहेत. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
खरातचा पाय अजून खोलात! तक्रारींसाठी महिला सरसावल्या, भोंदूबाबाविरोधात गुन्ह्याचा आकडा वाढणार