मध्य-पूर्वेतील तणावाला तात्पुरता ब्रेक लागला असला तरी कच्च्या तेलाच्या (crude oil market) जागतिक बाजारात मोठी हालचाल दिसून आली आहे. तेलाच्या किंमतींमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे देशांतर्गत महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, ही संभाव्य झळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू नये यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलत उत्पादन शुल्कात १० रुपयांची कपात केली. या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा धोका मोठ्या प्रमाणात टळला असून सध्या इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात सरकारला यश आले आहे.

कपातीनंतर पेट्रोलवरील (crude oil market) विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क १३ रुपयांवरून थेट ३ रुपयांपर्यंत खाली आले आहे, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क पूर्णपणे शून्य करण्यात आले आहे. त्याचवेळी इंधन निर्यातीवर पुन्हा विंडफॉल टॅक्स लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व उपाययोजनांमुळे सरकारच्या महसुलावर मोठा परिणाम होणार असून अंदाजे १.७० लाख कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागू शकतो. तरीही, महागाईवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खरेदीसाठी वाढलेल्या गर्दीच्या (crude oil market) पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू करण्यात आली आहे. आज सकाळी ६ वाजल्यापासून हे आदेश लागू झाले असून ११ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत ते कायम राहणार आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम ३७ अंतर्गत अप्पर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
तथापि, पोलीस, शासकीय कर्मचारी, तसेच विवाह, (crude oil market) अंत्ययात्रा आणि पूर्वपरवानगी घेतलेल्या धार्मिक मिरवणुकांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. सभा, मोर्चे आणि ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलचा अतिरिक्त साठा न करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही. दरम्यान, राज्यातील विविध शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याचे दिसून येत आहे. मुंबईसह इतर शहरांमध्येही दरांमध्ये मोठा बदल झालेला नाही. त्यामुळे सध्या ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी जागतिक परिस्थितीवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा :
खरातचा पाय अजून खोलात! तक्रारींसाठी महिला सरसावल्या, भोंदूबाबाविरोधात गुन्ह्याचा आकडा वाढणार