देशभरात पेट्रोल तुटवड्याच्या अफवांनी जोर धरला असताना सोशल मीडियावर काही धोकादायक प्रकार समोर येत आहेत. अनेक ठिकाणी नागरिक प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन आणि ड्रममध्ये पेट्रोल साठवताना दिसत आहेत. मात्र तज्ज्ञ आणि प्रशासनाकडून याबाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे की, (petrol) अशी साठवणूक केवळ बेकायदेशीरच नाही तर जीवघेणीही ठरू शकते.

भारतात इंधनाची विक्री, साठवणूक आणि वाहतूक यासाठी पेट्रोलियम अधिनियम, १९३४ आणि पेट्रोलियम नियम, २००२ अंतर्गत कडक नियम लागू आहेत. या कायद्यांनुसार पेट्रोल पंपांना कोणत्याही अनधिकृत किंवा असुरक्षित भांड्यात इंधन देण्यास स्पष्ट बंदी आहे. पेट्रोल फक्त वाहनाच्या टाकीत किंवा विशेष मान्यता प्राप्त धातूच्या कंटेनरमध्येच भरता येते.तज्ज्ञांच्या मते पेट्रोल अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे प्लास्टिकच्या बाटल्या किंवा ड्रममध्ये ते साठवणे अत्यंत धोकादायक ठरते. (petrol) अशा भांड्यांमध्ये अंतर्गत दाब सहन करण्याची क्षमता नसते. शिवाय प्लास्टिकमध्ये स्थिर विद्युत निर्माण होण्याची शक्यता जास्त असल्याने अगदी छोट्या ठिणगीमुळेही मोठा स्फोट होऊ शकतो. काही वेळा पेट्रोलमुळे प्लास्टिक कमकुवत होऊन गळती होते आणि त्यामुळे आग लागण्याचा धोका वाढतो.
प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, जर एखादा पेट्रोल पंप नियमांचे उल्लंघन करताना आढळला तर त्याचा परवाना निलंबित किंवा रद्द केला जाऊ शकतो. तसेच अवैध साठवणूक किंवा धोकादायक पद्धतीने इंधन वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवरही कठोर कारवाई केली जाऊ शकते. दोषी आढळल्यास मोठा दंड आणि तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. (petrol) दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचं आवाहन करण्यात येत आहे. सुरक्षितता लक्षात घेता अशा प्रकारे इंधन साठवण्याचे प्रकार टाळावेत, अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
हेही वाचा :
रिकाम्या पोटी वेलचीचं सेवन केल्यास कोणते आजार झटक्यात बरे होतात? घ्या जाणून
सोशल मीडियावर मोठा बदल; फेसबुक इंस्टाग्राम वापरण्यासाठी करावी लागणार KYC
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! ‘इतक्या’ पदांची भरती जाहीर