मध्यपूर्वेत तणाव पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. इराण आणि अमेरिका (ongoing conflict) यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने गंभीर वळण घेतले असून, परिस्थिती अधिकच बिघडताना दिसत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 6 एप्रिलपर्यंत युद्धबंदी जाहीर केली असली, तरी प्रत्यक्षात जमिनीवर हल्ले थांबलेले नाहीत. युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चेचे प्रयत्न सुरू आहेत, पण इराणने ठेवलेल्या अटी पूर्ण झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर (ongoing conflict) इराणने सऊदी अरेबियातील प्रिन्स सुलतान एअर बेस येथे मोठा हल्ला चढवला. हा हल्ला मिसाईल आणि ड्रोनच्या माध्यमातून करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामुळे अमेरिकन लष्कराचे मोठे नुकसान झाले असून, अनेक सैनिक जखमी झाले आहेत. लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, किमान 12 पेक्षा अधिक सैनिक जखमी झाले असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे.
या हल्ल्यात अमेरिकेच्या हवाई दलाच्या महत्त्वाच्या बोईंग KC-135 स्ट्रॅटोटँकर विमानाचेही (ongoing conflict) मोठे नुकसान झाले आहे. हे विमान लष्करी ऑपरेशन्ससाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, त्यामुळे या नुकसानीचा थेट परिणाम अमेरिकेच्या कारवाईवर होण्याची शक्यता आहे. इराणने यापूर्वीच इशारा दिला होता की, ज्या ठिकाणी अमेरिकन लष्कर उपस्थित असेल, त्या सर्व ठिकाणांना लक्ष्य केले जाईल.
या सततच्या हल्ल्यांमुळे अमेरिकेतही खळबळ उडाली आहे. आतापर्यंत या (ongoing conflict) संघर्षात शेकडो सैनिक जखमी झाले असून, मृतांची संख्याही वाढत आहे. सुरुवातीला अपेक्षेपेक्षा हा संघर्ष अधिक कठीण आणि धोकादायक ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. दोन्ही देशांमधील वाढता तणाव आणि सुरू असलेले हल्ले पाहता, हा संघर्ष लवकर थांबेल का, याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे.
हेही वाचा :
खरातचा पाय अजून खोलात! तक्रारींसाठी महिला सरसावल्या, भोंदूबाबाविरोधात गुन्ह्याचा आकडा वाढणार