त्वचेची काळजी न घेतल्याने त्यासंबंधीचे आजार होतात.(skin)संसर्गसारख्या समस्या होतात. त्यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते. त्वचेचा काळपटपणा वाढतो. त्यात चेहरा निस्तेज दिसतो. तर मान आणि गळ्यावरील त्वचा काळपट दिसते. ती इतकी काळी होते की, ती वजरीने घासून वा साबण लावून निघत नाही. मग घरात अनेक प्रयोग सुरू होतात. पण त्यामुळे तिथली त्वचा ही भाजते अथवा चरचर होते. घरातील तुरटीचा वापर करून तुम्ही गळ्याचा काळपटपणा कमी करू शकता.

तुरटीच्या मदतीने तुम्ही मानेवरील काळपटणा दूर करू शकता. तुरटीच्या मदतीने मानेवरील मळच नाही तर काळपट थर कमी करू शकता. त्या ठिकाणी एक नैसर्गिक चमक आणू शकता. (skin)त्यासाठी तुरटी हा जालीम उपाय आहे. तुरटीमुळे मानेवरील खिळ आणि मस सुद्धा कमी होतात. भारतात अनेक वर्षांपासून तुरटीचा वापर करण्यात येतो. पाणी स्वच्छ करण्यापासून ते त्वचेसाठी तुरटीचा वापर होतो. तुरटीचा वापर करण्यापूर्वी ती चांगली धुवून काढा. त्यानंतर 5 मिनिटांपर्यंत तुरटी हळुवारपणे त्वचेवरून फिरवा. हलक्या हाताने ती घासा. तुरटी त्वचेवर रगडू नका. त्यानंतर साध्या पाण्याने पुन्हा मान, गळा धुवून काढा.

मान आणि गळ्यावरील काळपटपणा घालवण्यासाठी तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुरटीचा वापर करू शकता. तुमच्या मानेवरील काळपटा जस जसा कमी होईल.(skin) तुरटीचा वापर कमी करा. जर काळपटपणा पूर्णपणे गेला तर मग तुरटीचा वापर करणे बंद करा. दीर्घकाळ तुरटीचा वापर हा शरीराला अपायकारक ठरतो. तुरटीचा अतिरेक टाळा.तुरटीचा वापर करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. जर तुरटी लावल्यानंतर तुमच्या त्वचेची जळजळ अथवा आग होत असेल तर तुरटीचा वापर लागलीच थांबवा. तुरटी रोज त्वचेवर लावू नका. तुरटीचा वापर करतानी ती रगडू नका. तुरटीचा तुकडा लावताना त्याला कनोर तर नाही ना, याची खात्री करा, नाहीतर त्वचा चिरण्याची भीती असते. कोरड्या त्वचेवर तुरटी आजिबात लावू नका. त्वचा ओली केल्यावर त्यावर तुरटी फिरवा.
हेही वाचा :
मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
‘दयाबेन’ने केलं अश्वमेध महायज्ञ; पती-मुलांसह केली पूजा
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय