‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दयाबेनची भूमिका(series) साकारलेल्या दिशा वकानीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती पती आणि मुलांसोबत एक यज्ञ करताना दिसतेय.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दयाबेनची(series) भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिशा वकानी गेल्या काही वर्षांपासून अभिनयापासून दूर आहे. 2017 मध्ये तिने बाळंतपणासाठी ब्रेक घेतला होता, परंतु त्यानंतर ती मालिकेत परतलीच नाही.
दिशाला दोन मुलं असून ती सध्या तिच्या कौटुंबिक जीवनावर लक्ष केंद्रीत करत आहे. ती मालिकेत परत कधी येणार, याची सतत विचारणा चाहत्यांकडून होत असते. परंतु याचं नेमकं उत्तर निर्मात्यांकडेही नाही. असं असलं तरी दिशाचे काही फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.
सध्या तिचा एक व्हिडीओ समोर आला असून, यामध्ये ती पती आणि दोन्ही मुलींसह महाराष्ट्रात अश्वमेध महायज्ञ करताना दिसली. या यज्ञात ती कुटुंबीयांसह सहभागी झाली. दिशाच्या फॅनक्लबकडून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ती पतीसह यज्ञ आणि पूजा करताना दिसून येत आहे.
अशा प्रकारचे यज्ञ होत राहिले पाहिजेत, अशीही प्रतिक्रिया ती यात देताना दिसतेय. “श्रीरामचंद्र भगवान यांनीसुद्धा अश्वमेध महायज्ञ केलं होतं. असे यज्ञ झाल्याने पर्यावरणात सुधारणा होते. सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि लहान मुलांनाही त्यातून बरंच काही शिकायला मिळतं,” असं ती म्हणाली.
“सर्वांच्या मनात चांगले विचार येतात. अशा यज्ञात सहभागी होता आल्याने मी स्वत:ला खूप नशिबवान समजते”, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत. दिशाचा हा व्हिडीओ पाहून ती मालिकेत कधी परत येणार, अशी विचारणा चाहत्यांकडून केली जात आहे.
हेही वाचा :
मुंबईत पावसाचा जोर ओसरला, पुढील 3 तासांचा अंदाज काय?
वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
पावसाचा तडाखा! मध्य आणि हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने, स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी