राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर (machine) आता सर्वच राजकीय पक्ष मतदानाच्या तयारीला लागले आहेत. उद्या, 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. मात्र मतदानाच्या अवघ्या काही तास आधीच निवडणूक आयोगाने घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ईव्हीएम मशीनसोबत अचानक एका नव्या यंत्राची एंट्री झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवडणूक आयोगाने ईव्हीएमसोबत ‘पाडू’ नावाचं नवं यंत्र उपलब्ध करून दिलं आहे. विशेष म्हणजे हे यंत्र बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी 140 ठिकाणी ठेवण्यात आले आहे. मतदानाच्या अगदी तोंडावर आलेल्या या निर्णयामुळे राजकीय पक्षांमध्ये चर्चांना उधाण आलं असून, मतमोजणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड(machine) कंपनीची मतदान यंत्रे वापरली जात आहेत. ही यंत्रे ‘एम3ए’ प्रकारातील असून त्यामध्ये बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटच्या माध्यमातून मतमोजणी केली जाते. मात्र, या प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून ‘पाडू’ यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्याप्रमाणे ‘पाडू’चा वापर सरसकट केला जाणार नाही. केवळ अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत, जेव्हा ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटद्वारे मतमोजणी शक्य होणार नाही, अशाच वेळी ‘पाडू’चा वापर केला जाईल. या यंत्राद्वारे मतमोजणीचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध असून, त्यामुळे तांत्रिक अडचणींच्या वेळी मतमोजणी रखडणार नाही, असा दावा आयोगाकडून करण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, ‘पाडू’ यंत्राचा वापर केवळ (machine)बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांपुरताच मर्यादित ठेवण्यात आला आहे. ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडूनच मतमोजणी करावी, असा प्राथमिक आदेश असून, तांत्रिक अडचण आल्यासच अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत ‘पाडू’ वापरण्यात यावा, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे. तसेच ‘पाडू’च्या वापरादरम्यान भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या तंत्रज्ञांची उपस्थिती अनिवार्य असणार आहे. यासोबतच या यंत्राबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखवण्याचे निर्देशही आयोगाने दिले होते.त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना ‘पाडू’ यंत्राचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.मतदानाच्या एक दिवस आधी घेतलेल्या या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेवर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असले, तरी आयोगाने पारदर्शकता राखण्यासाठी सर्व नियम पाळले जात असल्याचा दावा केला आहे. आता प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीदरम्यान ‘पाडू’चा वापर होतो का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :
२० जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात
युजवेंद्र चहल – धनश्री वर्मा घटस्फोटानंतर एकत्र येणार? क्रिकेटरने पोस्ट करून स्वतः
ट्रॅफिक चालान न भरल्यास आरसी रद्द, लायसन्स होणार सस्पेंड; सरकार नवीनEdit