सध्या सर्वत्र वाढत्या प्रदुषणाचा परिणाम हा आरोग्यासोबतच केसांवर होऊ लागला आहे.(hair) त्यामुळे प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि केमिकल उत्पादनांचा वापर केसांना कोरडे आणि फ्रिजी बनवतात. ज्यामुळे तुमचा लूक खराब होत नाही तर केस तुटण्यासही सुरूवात होते. तर अशावेळेस केसांची ही समस्या टाळण्यासाठी अनेकदा लोकं महागड्या सलून मध्ये जाऊन केसांवर ट्रिटमेंट घेतात. मात्र हजारो रूपये घालवून ही कालांतराने केसांची समस्या पुन्हा निर्माण होते. यासाठी केसांची ही समस्या दूर करण्यासाठी तुमच्या स्वयंपाकघरातील काही नैसर्गिक घटक देखील निरोगी केसांना प्रोत्साहन देऊ शकतात.

केसांना सिल्की आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही घरी काही हेअर मास्क बनवू शकता. (hair)कोरडेपणा कमी करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.केळीमध्ये पोटॅशियम, नैसर्गिक तेले आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे केसांची लवचिकता वाढते. मध हे एक नैसर्गिक आर्द्रता देणारे औषध आहे जे हवेतील ओलावा शोषून घेते आणि तुमच्या केसांना कोरडे होण्यापासून रोखले जाते.

साहित्य –

एक पिकलेले केळ एक चमचा मध हेअर मास्क बनवण्याची पद्धत: केळी पूर्णपणे मॅश करा, नंतर त्यात मध मिक्स करा. आता तयार हेअर मास्क केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा. 20 ते 30 मिनिटांनी केस कोमट पाण्याने आणि सौम्य शाम्पूने धुवा.

दही आणि कोरफडीचा हेअर मास्क
दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे स्कॅल्पला स्वच्छ करते. तर कोरफडीचे जेल केसांना खोलवर कंडीशनिंग करते. हा मास्क कोरडेपणामुळे होणारी खाज देखील कमी करतो.

साहित्य-

अर्धा कप ताजे दही

2 चमचे कोरफड जेल

हेअर मास्क बनवण्याची पद्धत: दही आणि कोरफड जेल हे दोन्ही घटक चांगले मिक्स करून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. आता तयार हेअर मास्क तुमच्या केसांना लावा आणि 30 मिनिटे तसेच राहू द्या. कोरफडीचा वापर तुमच्या केसांच्या पीएच पातळीला संतुलित करण्यास मदत करेल, ज्यामुळे ते लगेच मऊ होतील.

अंड आणि ऑलिव्ह ऑइल हेअर मास्क
केस प्रामुख्याने प्रथिनांपासून बनलेले असतात. अंडी हे प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहेत आणि ऑलिव्ह ऑइल केसांच्या कूपांमध्ये प्रवेश करते आणि त्यांना आतून पोषण देते.

साहित्य –

1 अंडे, 2 चमचे ऑलिव्ह ऑइल

हेअर मास्क बनवण्याची पद्धत: एक अंडे फेटून त्यात तेल मिक्स करा. (hair)हा हेअर मास्क लावताना केस थोडेसे ओले करून केसांना लावा. 20 मिनिटानंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुवा. केसांचा पोत सुधारण्यासाठी हा मास्क अद्भुत काम करतो.

नारळ तेल आणि व्हिटॅमिन ई
नारळाच्या तेलात केसांच्या कूपांमध्ये खोलवर जाण्याची अद्भुत क्षमता असते. व्हिटॅमिन ई कॅप्सूल केसांना नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात.

साहित्य-

3 चमचे नारळ तेल, 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल

हेअर मास्क बनवण्याची पद्धत: नारळाचे तेल थोडेसे गरम करा आणि त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील तेल मिक्स करा. आता तयार हेअर मास्क तुमच्या केसांना लावून तुमच्या स्कॅल्पला हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी केस धुवा.

हेही वाचा :

२० जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात

युजवेंद्र चहल – धनश्री वर्मा घटस्फोटानंतर एकत्र येणार? क्रिकेटरने पोस्ट करून स्वतः

ट्रॅफिक चालान न भरल्यास आरसी रद्द, लायसन्स होणार सस्पेंड; सरकार नवीन

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *