भाजप विधानसभा स्वबळावर लढणार? शिंदे, पवारांना दूर ठेवण्याची तयारी…
लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आहे.महाराष्ट्रात भाजपला (political party)अवघ्या 9 जागा मिळल्याने केंद्रीय नेतृत्व देखील नाराज आहे. अजित पवार गटाचा फायदा झाला नसल्याचे भाजप नेते सांगत आहेत. शिवाय अजित पवारांना महायुतीत घेतल्याने भाजपचा कोअर मतदार नाराज आहे. त्यामुळे भाजप विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा विचार करत असून त्यासाठी सर्वे देखील करत असल्याच्या चर्चा आहेत.
या चर्चांना भाजपकडून अधिकृतपणे कोणीही(political party) दुजोरा दिलेला नाही. मात्र, अजित पवार यांच्यामुळे फटका बसला असून शिंदे गटाला जी मदत केली त्याचा पूर्ण लाभ त्यांना घेता आला नसल्याची भावना भाजपमध्ये आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मराठा मतदार महायुतीच्या मागे उभे राहतील, अशी भाजपची अपेक्षा होती. मात्र, मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा फटका महायुतीला बसला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेली युती कायम ठेवावी मात्र अजित पवारांच्या सोबतच्या युतीचा फेरविचार करावा, अशी अपेक्षा भाजपचे पाठीराखे करत आहेत.
अजितदादांमुळे भाजपला BJP फटका बसला नसल्याचे छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितले. महायुतीला विदर्भात 10 पैकी तीन जागा मिळाल्या. भाजपचे आमदार असलेल्या ठिकाणी देखील भाजपच्या उमेदवार पिछाडीवर आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेशी युती करून भाजपची कामगिरी कशी असेल, राष्ट्रवादीसोबतची आघाडी कायम राहायची की नाही असे प्रश्न सर्वेक्षणात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, भाजपचे प्रदेश सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी ही चर्चा फेटाळली आहे. विरोधकांनी या बातम्या पेरलेल्या असल्याचे अजित चव्हाण म्हणाले.
हेही वाचा :
वीज पडून एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी; मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरात शिरलं पाणी
एनटीएने रद्द केले १,५६३ विद्यार्थ्यांचे वाढीव गुण; कारण काय?
आयसीसीचा वर्ल्ड कप बाबत मोठा निर्णय, भारताचा एका कारणामुळे सराव रद्द