पुण्यात अगदी रहदारीच्या भागात, भर चौकात “मानवी सांगाडा(skeletons)” आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली अन् धावपळ उडाली.सदर सगळा प्रकार गुरुवारी संध्याकाळी पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर चौकात घडली.

पुणे अहिल्यानगर रस्त्यावर असलेल्या या चौकात मध्यभागी मानवी हाडाचा सांगाडा पडला असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. हाडांचा सांगाडा डोके, धड आणि कमरेपर्यंत होता.रस्त्याच्या मध्यभागी असलेला सांगाडा मोठ्या रहदारीमुळे लक्षात न आल्यामुळे काही चार चाकी वाहने त्याच्यावरून गेली.
काही नागरिकांनी ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली. माहिती मिळताच पोलिसांनी जागेवर जाऊन तो मानवी सांगाडा(skeletons) ताब्यात घेतला आणि त्यानंतर सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला.पोलिसांनी हा सांगाडा व्यवस्थित तपासला असता तो प्लास्टर ऑफ पॅरिसचा आणि तारेचा वापर करून बनवलेला असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांचा जीव भांड्यात पडला.
हेही वाचा :
1000 फुट उंचीच्या लाटांचा तडाखा, या देशाला त्सुनामीचा बसणार फटका
‘लाडकी बहिण’नंतर महायुती सरकारची महिलांना मोठी भेट
आता फ्रीमध्ये फिरता येणार थायलँड…