अमेरिकेला पुन्हा एकदा तीव्र भूकंपाचा फटका बसला आहे. 8.0 रिश्टर स्केल तीव्रतेच्या धक्क्यांनी संपूर्ण प्रदेश हादरून गेला. दक्षिण अमेरिकेतील ड्रॅक पॅसेज या भागात भूकंपाचे केंद्र आढळले असून हा भाग दक्षिण-पूर्व प्रशांत महासागर व दक्षिण-पश्चिम अटलांटिक महासागरांना जोडतो.दरम्यान, केवळ दोन दिवसांपूर्वीच शास्त्रज्ञांनी या भागात मेगा त्सुनामी (tsunami)आणि महाभूकंपाचा इशारा दिला होता. विशेष म्हणजे हा भूकंप नेमका त्याच पट्ट्यात झाला आहे.

भूवैज्ञानिकांच्या मते, कस्केडिया सबडक्शन झोन हा संपूर्ण उत्तर अमेरिकेतील सर्वाधिक धोकादायक भाग मानला जातो. हा झोन उत्तर कॅलिफोर्निया ते व्हँकुव्हर बेटापर्यंत 600 मैलावर पसरलेला आहे. येथे फुका प्लेट आणि उत्तरी अमेरिकन प्लेट यांच्या घर्षणामुळे मोठ्या प्रमाणावर दबाव तयार होत असून त्यामुळे कधीही प्रचंड भूकंप होऊ शकतो.
शास्त्रज्ञ टीना दुरा यांनी दोन दिवसांपूर्वीच या भागात 8.0 तीव्रतेच्या भूकंपाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार आता या संपूर्ण किनारपट्टीवर 1000 फुटांपर्यंत महाकाय समुद्र लाटा उसळू शकतात, असा धोका वाढला आहे. विशेषतः कॅलिफोर्निया किनारपट्टीवरील वसाहतींना त्सुनामीचा (tsunami)फटका बसण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

याआधीही 30 जुलै रोजी रशियाच्या कामचटका द्वीपसमूहात 8.0 तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला होता. हा भाग जपानच्या जवळ असल्याने तेथेही त्सुनामीची शक्यता निर्माण झाली होती. गेल्या दोन महिन्यांत रशिया, जपान आणि आता अमेरिका याठिकाणी झालेल्या भूकंपांमुळे महासागरात प्रचंड हलचाली वाढल्या आहेत.2011 मध्ये आलेल्या त्सुनामीची आठवण अजूनही ताजी असताना, पुन्हा एकदा जगभरातील किनारी भागांवर महासंकटाचे सावट घोंगावत असल्याचे चित्र दिसत आहे.
हेही वाचा :
आता फ्रीमध्ये फिरता येणार थायलँड…
मुंबईत विश्रांती, मात्र राज्याच्या ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचं धुमशान
१५ मिनिटांमध्ये घरी बनवा ढाबास्टाईल दाल फ्राय,…..