बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका,(elections)जिल्हा परिषदेच्या निवडणुका नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या तीन महिन्यांच्या दरम्यान पूर्ण होणार आहेत. निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी यासंबंधित घोषणा केली होती. यात आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे.३१ जानेवारी २०२६ पूर्वी राज्यातील २९ महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांशी संबंधित प्रक्रियेला वेग दिल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या उच्चपदस्थ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२४, डिसेंबर २०२४ आणि जानेवारी २०२५ या ३ महिन्यांमध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका घेतल्या जातील.

सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येतील त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या जातील, जानेवारी २०२६ पर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल (elections)अशी माहिती देखील राज्य सरकारच्या सुत्रांनी दिली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह अन्य महानगरपालिकांच्या लढतीची चर्चा सुरु आहे.मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू अनेक वर्षांनी एकत्र येणार आहेत.

यामुळे महानगरपालिका निवडणुकांमध्ये चुरस वाढली आहे. अनेक ठिकाणी नव्याने तयार होऊ पाहणारी स्थानिक समीकरणे देखील आहेत. (elections)महायुती आणि महाविकास आघाडी हे काही ठिकाणी युतीने तर काही ठिकाणी स्वतंत्र लढत देणार असल्याचीही चर्चा आहे. मुंबईसह कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र लढतील. पण पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत मतविभाजनाचा फायदा महाविकास आघाडीला मिळू नये यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट परस्परांच्या विरुद्ध लढत देतील असेही म्हटले जात आहे.

हेही वाचा :

वर्दीतल्या सैतानाचं हादरवणारं कृत्य!

PhonePe, GPay आणि Paytm वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी

YouTube वर आले जबरदस्त AI फीचर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *