ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच शाळांच्या सुट्टीने झाली आहे.(October) 1 ऑक्टोबर रोजी महानवमी असल्यामुळे अनेक शाळांना सुट्टी आहे. यालाच जोडून 2 ऑक्टोबर म्हणजे गुरुवार या दिवशी दसरा आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याची सुरुवात ही विद्यार्थ्यांसाठी खास असणार आहे. ऑक्टोबर महिन्यात 17 दिवस बँक बंद राहणार आहे. संपूर्ण महिन्यात एक, दोन दिवस सोडले तर सलग 9 दिवस सुट्टी असणार आहे. देशात सध्या नवरात्र आणि दसऱ्याचा उत्साह आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. अनेकजण लाँग विकेंड बघून आपल्या कुटुंबांसोबत वेळ घालवत आहे. मात्र अजूनही अनेक लोक त्यांच्या मुलांच्या शाळेच्या सुट्ट्यांबद्दल गोंधळलेले आहेत. त्यांच्यासाठी ऑक्टोबर महिन्यातील शाळा-कॉलेजच्या सुट्ट्यांची यादी.

या वर्षी दसरा 2 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. हा दिवस गांधी जयंतीशी देखील आहे. परिणामी, बहुतेक राज्यांमधील शाळा 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी बंद राहतील. (October)काही ठिकाणी, सुट्टी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.महाराष्ट्र : 2 ऑक्टोबर दसरा, गांधी जयंती. 3 शुक्रवारी एक सुट्टी घेऊन 4 आणि 5 ला अनुक्रमे शनिवार, रविवार असणार आहे. तसेच दिवाळीची सुट्टी ही 18 ऑक्टोबरपासून धनत्रयोदशी सुरु होणार आहे. दिवाळीची सुट्टी 2 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.
उत्तर प्रदेश: दसरा आणि गांधी जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशातील(October) शाळा 1 आणि 2ऑक्टोबर रोजी बंद राहण्याची घोषणा करण्यात आली आहे.
बिहार: बिहारमधील बहुतेक जिल्ह्यांमध्ये, 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत शाळा बंद राहतील. काही जिल्ह्यांमध्ये, सुट्टी 5 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
दिल्ली: दिल्लीतील शाळा 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील (October)अशी घोषणा करण्यात आली आहे. 3 ऑक्टोबर रोजी वर्ग पुन्हा सुरू होतील. तथापि, खाजगी शाळांचे वेळापत्रक थोडे वेगळे असू शकते.
झारखंड: झारखंडमधील सरकारी शाळा 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील. अनेक शाळा 5 ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील.
ओडिशा: ओडिशामधील शाळा 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील.(October) 3 ऑक्टोबर रोजी वर्ग पुन्हा सुरू होतील.

पश्चिम बंगाल: दुर्गा पूजा हा पश्चिम बंगालमधील एक प्रमुख सण आहे. (October)त्यामुळे 24 सप्टेंबर पासून शाळा बंद आहेत. ही सुट्टी 6 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहील.
तेलंगणा: तेलंगणामधील शाळा 21 सप्टेंबर पासून बंद आहेत. 3 ऑक्टोबर रोजी वर्ग पुन्हा सुरू होतील.
हेही वाचा :
PCOD चा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो खोलवर परिणाम?
महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ;
दिलासादायक ! आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार;