अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एक मोठा विमान अपघात(accident) झाला आहे. बुधवारी (1 ऑक्टोबर) रात्री लागार्डिया विमानतळावर दोन विमाने पार्क करत असताना एकमेकांवर धडकली. ही दोन्ही विमाने डेल्टा एअरलाईन्सची होती आणि या अपघातात दोन्ही विमानांचे मोठे नुकसान झाले आहे.

डेल्टा एअरलाईन्सचे एक विमान गेटच्या दिशेने जात असताना, दुसरे विमान लँडिंगनंतर गेटकडे येत होते, त्याच वेळी हा भीषण अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की, एका विमानाचा पंख दुसऱ्या विमानाच्या नाकावर आदळला आणि त्या धडकेत पंख तुटून खाली पडला. पायलटने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला, पण अपघात टळला नाही. या अपघातात(accident) एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

न्यूयॉर्कमध्ये याआधीही विमान अपघात
न्यूयॉर्कमध्ये याआधीही अनेक वेळा विमान अपघात झाले आहेत. नोव्हेंबर 2001 मध्ये, टेकऑफदरम्यान एका विमानाचा अपघात झाला होता, ज्यात सुमारे 260 लोकांचा मृत्यू झाला होता. जानेवारी 2009 मध्ये, एका विमानाचे दोन्ही इंजिन अचानक बंद पडले होते. त्यावेळे पायलटने अत्यंत धाडसी निर्णय घेत ते विमान हडसन नदीमध्ये सुरक्षित उतरवले होते.

अहमदाबादमध्येही झाला होता मोठा विमान अपघात
गुजरातच्या अहमदाबाद शहरातही 12 जून 2025 रोजी एक मोठा विमान अपघात झाला होता. या वेळी एअर इंडियाचे एक विमान क्रॅश झाले होते. या अपघातात 241 लोकांचा मृत्यू झाला होता. विमानात एकूण 242 प्रवासी होते, केवळ एकच व्यक्ती अपघातातून बचावली होती.

हेही वाचा :

रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक अहवाल समोर!

राज्यातला पाऊस थांबणार कधी? अखेर हवामान विभागाने सांगितली तारीख

राम-रावणाच्या युद्धाशी दसऱ्याला गाडी धुण्याचा काय संबंध? 99% लोकांना खरं कारण माहिती नाही

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *