राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेत्या रोहिणी खडसे यांचे पती(light) प्रांजल खेवलकर यांच्याशी संबंधित खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे.प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींची ड्रग्स पार्टी प्रकरणात फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. या प्रकरणात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर तब्बल दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ जेलमध्ये होते. प्रांजल खेवलकर यांची येरवडा जेलमधून सुटका झाली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींची फॉरेन्सिक चाचणी केली होती, ज्याचा अहवाल आता पोलिसांना मिळाला आहे. या अहवालानुसार, त्यांच्या शरीरात ड्रग्सचे अंश आढळले नाहीत. यामुळे दोन महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात राहिलेल्या खेवलकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(light) पुणे पोलिसांच्या पथकाने २७ जुलै रोजी पुण्यातील खराडी भागात एका खोलीतील पार्टीवर छापा टाकला होता. या यांच्यासह एकूण सात जणांना अटक करण्यात आली होती. प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यानंतर त्यांनी दीड महिन्यांहून अधिक काळ येरवडा जेलमध्ये घालवला.

पुणे सत्र न्यायालयाने २५ सप्टेंबर रोजी प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर केला. अंमली पदार्थांचे सेवन केले की नाही, हा जामीन मिळवण्यातील एक कळीचा मुद्दा होता. (light) जामीन मिळाल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली.प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई असल्याने या प्रकरणाची राज्यभर मोठी चर्चा झाली होती आणि यामुळे राजकीय वातावरण तापले होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडेही यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. आता फॉरेन्सिक अहवालातून अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या प्रकरणाला निश्चितच वेगळे वळण मिळणार आहे.
हेही वाचा :
PCOD चा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो खोलवर परिणाम?
महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ;
दिलासादायक ! आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार;