भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ (question)नेते जयंत पाटील यांच्यात आता पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी जयंत पाटलांच्या वडिलांचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे. पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे. पडळकर नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

हिंदू बहूजन दसरा मेळावा सांगलीतील आरेवाडी येथील बिरोबा बन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी आपल्या भाषणात बोलताना पडळकर म्हणाले की, ‘माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे.(question) माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात. माझा सवाल आहे की, जयंत पाटील तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले होते हे सांगा. मी जे विषय मांडले त्याच्यावर चर्चा करा. कारखाने ढापता आणि माझ्यावर पोलीस, तलाठी, तहसीलदार यांना पुढे करतात, मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे.’

पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, ‘सांगलीमध्ये महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा घेण्यात आली, पण मला आई बहिणीवर शिव्या देत होते. मला ते गोप्या गोप्या म्हणाले, कुठल्याही टीव्हीवर याची चर्चा झाली नाही. एक विधानसभेचा आमदार जो 40 हजार मतांनी निवडून आला आहे त्याला हे शिव्या देत आहेत, त्याला गोप्या गोप्या म्हणत आहेत. यावर कुठे स्पेशल रिपोर्ट आला नाही, म्हणजे मला गोप्या म्हणतात हे यांना मान्य आहे.’पडळकर पुढे बोलताना म्हणाले की, मला गोप्या म्हणूद्या, मी सामान्य घरातील पोरगा आहे. मला गोप्या म्हटलं तरी फरक पडत नाही. मग मी तुला जयंत्या म्हटलं तर चालेल का? मी म्हणणार नाही, पण असं म्हटलं तर चालेल का? असा सवाल जयंत पाटील यांना विचारला आहे. (question)दरम्यान, पडळकर यांच्या या विधानानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. यावर जयंत पाटील आणि राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

धनगर आरक्षणावर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, मी धनगर आरक्षण मिळवण्यासाठी सक्षम आहे. ओबीसी आरक्षणाला पाठबळ आहे, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. (question)मराठा आरक्षणाला वेगळा प्रवर्ग केल्यास प्रश्न सुटेल. आरक्षण मिळवण्यासाठी सरकारचा पाठिंबा मिळवायचे असेल तर एकत्र या. मी सरकारचा विषय आला तर सरकारचा विषय मांडतो, धनगरांचा विषय आला तर धनगरांचा विषय मांडतो, ओबीसींच्या विषयाला ओबीसांचा विषय मांडतो.

हेही वाचा :

PCOD चा महिलांच्या मानसिक आरोग्यावर होतो खोलवर परिणाम?

महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ;

दिलासादायक ! आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार;

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *