लातूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टिव्ही, स्मार्टफोन यांचा वाढता वापर यामुळं शाळकरी मुलांचे वर्तन बिघडत चालले आहे. मुलं चुकीच्या मार्गाला लागले आहेत. लातूरमध्ये समस्त पालकांना हादरवणारी एक घटना घडली आहे. दोन शाळकरी(student) मुलांच्या वर्तनामुळं एकच खळबळ उडाली आहे.

लहान मुलंही मोबाईलच्या आहारी गेले आहेत. आता अत्यावश्यक गरजांमध्ये मोबाईलचा समावेश आहे. मात्र मोबाईलमध्ये मुलं काय बघतात? त्यांचे काय सुरू आहे? यावर पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. लातूरमध्ये जी घटना घडली आहे, ती पालकांची चिंता वाढवणारी आहे. इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थांनी केलेला घृणास्पद प्रकारामुळं एकच गोंधळ उडाला आहे.

तिसरीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी(student) त्याचे वयच साधारण 8-9 वर्षे असेल. या वयात अभ्यास, खेळणे आणि दंगा करण्याचे सोडून या विद्यार्थ्यांनी वर्गमित्रावरच अश्लील व्हिडिओ पाहून अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने पालकही भेदरले असून शाळा प्रशासनातही खळबळ उडाली आहे. गुरुवारी ही घटना उघडकीस आली आहे.

लातूर शहराजवळ असलेल्या एका सरकारी शाळेतच ही घटना घडली आहे. तिसरीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सोशल मीडियावर एक अश्लील व्हिडीओ बघितला. शाळेतील वर्गात तो होता. अश्लील व्हिडिओ पाहून त्याने वर्गमित्रावरच अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना जेव्हा शिक्षकांना कळली, तेव्हा तेही हादरून गेले. विद्यार्थ्याची विचारपूस केल्यानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ बघितल्याचे आणि ते बघून असे करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. या घटनेने शाळेत खळबळ उडाली. शिक्षक आणि पालकांनीही धक्का बसला आहे.

हेही वाचा :

हिवाळ्यात बऱ्याच दिवस पालेभाज्या राहतील फ्रेश, फॉलो करा या खास टिप्स

‘तोंड फोडून टाकेन..’, पापाराझींवर भडकल्या जया बच्चन, दिली वॉर्निंग

बिहार निवडणूक निकालांचा शेअर बाजारावर तगडा परिणाम

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *