ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभेच्या सदस्या जया बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या तापट(warning) स्वभावामुळे सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. मुंबईतील एका कार्यक्रमातून बाहेर पडताना पापाराझींनी त्यांच्या भोवती गर्दी करत फोटो काढण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर जया बच्चन यांनी संताप व्यक्त करत फोटोग्राफर्सना सुनावल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.जया बच्चन आपल्या मुलगी श्वेता बच्चनसोबत कार्यक्रमाला उपस्थित होत्या. बाहेर पडताना पापाराझींनी त्यांच्या भोवती घोळका केला आणि फोटो क्लिक करण्यासाठी गडबड सुरू केली. सततच्या गोंधळाने वैतागलेल्या जया बच्चन काही क्षण थांबल्या आणि रागाने म्हणाल्या, “बस.. पुरे झालं. बाजूला व्हा.” श्वेताने त्यांचा हात धरून त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला.

पण कार्यक्रमाच्या आवाराबाहेरही परिस्थिती शांत नव्हती. पुन्हा एकदा पापाराझींनी(warning) त्यांच्या भोवती गर्दी केली आणि गोंगाट वाढला. अखेर संताप अनावर झाल्यानंतर जया बच्चन यांनी रागाच्या सुरात फोटोग्राफर्सना हटकत म्हटलं – “तोंड बंद ठेवा, फोटो घ्या… तुम्ही फोटो घ्या पण उद्धटपणा करू नका. कमेंट्स करत बसतात.”यावेळी एका व्यक्तीसोबत संवाद साधताना जया बच्चन “तोंड फोडून टाकेन” असे म्हणताना दिसतात, अशी क्लिपही समोर आली असून ती सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी जया बच्चन यांना सपोर्ट करत पापाराझींच्या अतिरेकावर टीका केली आहे, तर काहींनी त्यांच्या संतप्त प्रतिक्रियेवर ट्रोलिंग सुरू केली आहे.गेल्या काही महिन्यांपासून पापाराझी कल्चरवर वारंवार टीका होत असून धर्मेंद्र कुटुंबासह अनेक कलाकारांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. काही नेटकऱ्यांनी तर याच त्रासाला कंटाळून विराट कोहली आणि अनुष्का शर्माने भारत सोडल्याची चर्चा रंगवत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा :
बेशुद्ध मुलाला हातात घेऊन हताश बाप पोहचला जगन्नाथाच्या दारी, आरतीवेळी मुलाने उघडले डोळे अन्… Video Viral
स्थानिक स्वराज्य निवडणूका राजकारण्यांचा सावळो गोंधळ
इचलकरंजी मधील यड्राव येथे लग्न करीत नसल्याने आईवर विळतीने हल्ला