राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार सुरु आहे.(creates)काही दिवसांनंतर राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वच नेते आणि पक्ष या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. या निवडणुकीत विजय मिळवून स्थानिक स्वराज्य संस्थेत आपली ताकद दाखविण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असणार आहे. मात्र आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी राजीनामा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.(creates) मात्र आता कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी राजीनामा दिला आहे. हा राज ठाकरेंना मोठा धक्का आहे. यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी मनसेची ताकद कमी झाली आहे. आता प्रकाश भोईर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी हा पक्षप्रवेश होणार असल्याचेही बोलले जात आहे.
गेल्या आठवड्यात एका भूमीपूजनाच्या कार्यक्रमात(creates) प्रकाश भोईर हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सोबत एकाच मंचावर उपस्थित होते. तेव्हापासून ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची प्रमाणात चर्चा रंगली होती. त्यावेळी लवकरच प्रकाश भोईर वंदे मातरम म्हणतील असं विधान रवींद्र चव्हाण यांनी केले होते. माध्यमांनी याविषयी विचारणा केली असता प्रकाश भोईर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील वाटचाल ठरवणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता त्यांनी राज ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रकाश भोईर यांनी आज जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.(creates) आता ते येत्या रविवारी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. असे झाल्यास आगामी निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. तर मनसेला मोठा फटका बसणार आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रकाश भोईर यांनी महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन दूर, आदिती तटकरेंकडून योजनेबाबत
लक्ष द्या! नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची वेळ बदलली; निवडणूक
अंजली दमानिया अजित पवारांविरोधातील 21 किलो