महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनानिमित्त पावसाची हजेरी अधिक (predicted)वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या अनेक भागांत ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अंदाज जारी करण्यात आला असून, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टी भागात जोरदार पावसाची शक्यता असून, येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस पडेल, तर घाटमाथा भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भातील नागपूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेग वाढेल. (predicted)त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून दिला जात आहे.मराठवाड्यात लातूर, बीड, परभणी, हिंगोली, जालना आणि नांदेड जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत मध्यम पावसासह विजांचा कडकडाट व जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे. पिकांवरील ओलसरपणा कमी करण्यासाठी योग्य निचऱ्याची सोय करणे अत्यावश्यक ठरणार आहे.

नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित असून, काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात. (predicted)येलो अलर्टमुळे शेतकऱ्यांना पिकांचे योग्य व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला गेला आहे. कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार, भाजीपाला पिकांमध्ये मुळकुज व बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी मल्चिंग करावे, फळ पिकल्यावर त्वरित काढणी करावी. जास्त पावसात खतांचा अपव्यय टाळण्यासाठी पावसानंतरच द्रवरूप खतांची फवारणी करावी. तसेच, धान पिकासाठी पाण्याचा पुरवठा नियंत्रित ठेवणे आणि जास्त पाणी झाल्यास निचऱ्याची सोय करणे गरजेचे आहे.
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
दिवाळीनंतर दैनंदिन वापरातील ‘या’ वस्तू स्वस्त होणार? मोदींनी दिले संकेत
माउंटबॅटन यांना भारतातील कोणत्या शहरात प्रेम झाले? त्यांची लव्हस्टोरी तुम्हाला नक्कीच माहीत नसेल