उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यात तर्कवितर्क आणि (plane) आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काही नेत्यांकडून हा अपघात घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात असताना, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी या चर्चांना थेट आव्हान देत स्पष्ट भूमिका मांडली आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना अशा गंभीर घटनेला वेगळी कलाटणी देणे चुकीचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.उज्ज्वल निकम यांनी अजित पवार यांच्या अपघातासोबतच जस्टिस लोया यांच्या मृत्यूबाबत होणाऱ्या दाव्यांवरही भाष्य केले. पुराव्यांशिवाय केवळ संशयाच्या आधारावर निष्कर्ष काढणे हे कायद्याच्या दृष्टीने चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये राजकारण टाळले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

विमानात 5 की 6 लोक होते, या प्रश्नावर उज्ज्वल निकम म्हणाले की, (plane)खासगी विमानाच्या प्रत्येक उड्डाणाची अधिकृत नोंद विमान प्राधिकरणाकडे असते. मात्र, त्या विमानात सहा प्रवासी होते, असा कोणताही अधिकृत पुरावा आजवर समोर आलेला नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता तपास यंत्रणांच्या निष्कर्षांची वाट पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, अपघाताच्या वेळी विमानात मोठ्या प्रमाणात इंधन असल्याने आग तीव्र झाली आणि त्यामुळे मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले. त्यामुळे यामागे कट असल्याचे म्हणणाऱ्यांनी ठोस पुरावे सादर करणे आवश्यक आहे. केवळ संशय व्यक्त करून गंभीर विषयाला वेगळी दिशा देणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे बुधवारी सकाळी 8.10 च्या (plane)सुमारास मुंबईहून बारामतीच्या सभेसाठी निघाले होते. विमान बारामती विमानतळाजवळ पोहोचले असता दृश्यमानता अत्यंत कमी होती. सुरक्षित लँडिंगसाठी किमान 5 किलोमीटर दृश्यमानतेची गरज असते, मात्र अपघाताच्या वेळी ती केवळ 3 किलोमीटर इतकी होती. त्यामुळे वैमानिकाने गो-अराउंड करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच दरम्यान हा भीषण अपघात घडला. या अपघातानंतर विमान कंपनी आणि बारामती विमानतळाच्या व्यवस्थापनावरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, अधिकृत चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे उज्ज्वल निकम यांनी अधोरेखित केले आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका कधी होणार? तारखेबाबत महत्वाची अपडेट समोर

पुढील तीन दिवसांत पावसाचा अंदाज; ढगाळ हवामानामुळे थंडीत वाढ

 सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *