भुत-प्रेत-आत्मा यासर्व गोष्टींमध्ये काहीजणांचा विश्वास असतो तर काहींचा नसतो.(ghosts) त्याचसोबत अनेक लोक याबाबतच्या इतर गोष्टीं देखील मानतात. जसं अनेकांचा असा विश्वास असतो की रात्री कुत्रे भुंकतात किंवा रडतात त्यामागे देखील असंच काहीसं कारण मानतात. जसं की कुत्र्यांना रात्री आत्मे, भुते दिसतात म्हणून ते मोठ्याने भुंकतात किंवा रडतात. किंवा कोणतीतरी दुर्घटना घडणार असेल तरी कुत्रे रात्रीचे रडतात असंही म्हटलं जातं. पण हे खरंच असं असतं का? आणि याबाबत आणि विज्ञान याबद्दल काय म्हणतं? चला जाणून घेऊयात.

कुत्रे हे दिवसापेक्षा रात्री जास्त भुंकताना दिसतात. रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याशी संबंधित अनेक समजुती आहेत. असे म्हटले जाते की रात्री भूत आणि आत्मे पाहिल्यानंतर कुत्रे भुंकतात किंवा कोणाचा मृत्यू होणार असेल किंवा काही दुर्घटना घडणार असेल तर त्याची चाहुल आधीच कुत्र्यांना होते. (ghosts)म्हणून ते संकेत आपल्याला देण्यासाठी म्हणून ते रडतात किंवा भुंकतात असं म्हटलं जातं. त्यामुळे अनेक लोकांचा असा विश्वास आहे की रात्री कुत्रे भुते पाहिली की भुंकू लागतात.
कुत्र्यांना आत्मे दिसतात हे खरे असते असं म्हटलं जातं. कारण त्यांच्या डोळ्यांमध्ये माणसांपेक्षा जास्त वेगाने पाहण्याची आणि खोल दृष्टी असते . ती पाहण्याची क्षमता असते. हेच कारण आहे की जेव्हा कुत्रे नकारात्मक ऊर्जा पाहतात तेव्हा ते भुंकायला लागतात.किंवा त्यांना ते संकेत लवकर जाणवतात परंतु विज्ञान या दाव्यांवर अजिबात विश्वास ठेवत नाही.विज्ञानानुसार, कुत्रे रात्री भुंकतात कारण त्यांना एकटेपणा जाणवतो आणि ते त्यांची भीती व्यक्त करण्यासाठी म्हणून रात्री भुंकतात. विज्ञानानुसार, कुत्र्यांना मानवांपेक्षा जास्त संवेदनशील इंद्रिये असतात. (ghosts)त्यामुळे आपण ज्या गोष्टी पाहू शकत नाही किंवा जाणवू शकत नाही त्या गोष्टी कुत्र्यांना लगेच जाणवतात. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना भूत दिसतात.

कुत्र्यांची वास घेण्याची आणि ऐकण्याची क्षमता
तसेच कुत्र्यांची वास घेण्याची आणि ऐकण्याची क्षमता माणसापेक्षा तीव्र असते. त्याने लगेच वास आणि ऐकू येतं. त्यामुळे कुत्रे लगेच प्रतिक्रिया देतात. त्यामुळे अनेकदा कुत्रे रात्रीचे रडतातही.
कुत्रे भुंकण्याची किंवा रडण्याची इतर नैसर्गिक कारणे:
आवाज: कुत्रे त्यांच्या आजूबाजूच्या आवाजांना प्रतिसाद म्हणून भुंकू शकतात, जसे की इतर प्राणी, गाड्या, किंवा मानवी आवाज.
धोका किंवा भीती: कुत्रे एखाद्या अनोळखी व्यक्ती किंवा प्राण्याला पाहून किंवा धोकादायक परिस्थितीचा अंदाज आल्यास भुंकू लागतात
संवाद: कुत्रे इतर कुत्र्यांशी संवाद साधण्यासाठी किंवा त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी भुंकू शकतात.
एकटेपणा किंवा कंटाळा: एका रिसर्चनुसार काहीवेळा कुत्र्यांना एकटे वाटत असताना किंवा कंटाळा आल्यावर ते भुंकू लागतात.
वैद्यकीय कारणे: काहीवेळा कुत्रे आजारी असल्यामुळे किंवा त्यांना वेदना होत असल्यामुळेही भुंकू शकतात.
अंधश्रद्धा | भूत-पिशाच्च: काही लोकांचा असा विश्वास आहे की कुत्रे भुंकतात कारण त्यांना भूत किंवा आत्मा दिसतो, पण याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
दिवाळीनंतर दैनंदिन वापरातील ‘या’ वस्तू स्वस्त होणार? मोदींनी दिले संकेत
माउंटबॅटन यांना भारतातील कोणत्या शहरात प्रेम झाले? त्यांची लव्हस्टोरी तुम्हाला नक्कीच माहीत नसेल