राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या आहे. काही जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली होती, त्यासाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर 21 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर किंवा तत्पूर्वी महानगर पालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकींसाठी राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच आता पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जोरदार इनकमिंग झाली आहे. एका माजी नगरसेवकासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत मशाल हाती घेतली आहे.

पुण्यातील माजी नगरसेवक सुनील गोगले, भाजप माथाडी पुणे शहर उपाध्यक्ष अक्षय भोसले, मातंग एकता आंदोलनाच्या भारती मिसाळ, क्रांतिवीर झोपडपट्टी संघटनेचे राजेश परदेशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे श्रवण केकाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, शिवसेना संघटक वसंत मोरे, पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे.

महानगर पालिका निवडणुकीची घोषणा होणार

निवडणूक आयोगाकडून आगामी काळात पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. सध्या मतदार याद्यांची पडताळणी आणि दुरूस्तीचे काम आयोगाकडून सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. आगामी काळात आणखी काही पक्षप्रवेशही पहायला मिळण्याची शक्यता आहे.

पुणे महानगरपालिकेची निवडणूक यंदा रंगतदार होण्याची शक्यता आहे. नगर परिषदांच्या निवडणूकीत अनेक पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पुण्यात आता महायुतीतील आणि महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र लढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास निवडणुकीतील चुरस वाढणार आहे.





By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *