स्वातंत्र्यदिनानिमित्त आज 15 ऑगस्ट महाराष्ट्रातील ॲप-आधारित टॅक्सी(traveling) व रिक्षा चालकांनी एकदिवसीय संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे ओला, उबर आणि रॅपिडोच्या कॅब-रिक्षा बुक करण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. सुट्टीचा दिवस असल्याने स्टेशन, एअरपोर्ट तसेच कुटुंबासह फिरायला जाणाऱ्यांच्या प्रवासयोजनेवर याचा थेट परिणाम होऊ शकतो.चालक संघटनांनी सकाळी 8 ते दुपारी 4 या काळात वाहन रस्त्यावर न उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या प्रमुख शहरांतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांपुढे RTO शांततापूर्ण निदर्शने होणार असून, चालकांनी हा दिवस ‘भारतीय चालक एकता दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

चालकांच्या म्हणण्यानुसार ॲप कंपन्या मनमानी शुल्क कपात व कमी भाडेदरांमुळे आर्थिक शोषण करीत आहेत. प्रति किमी केवळ 8 ते 12 रुपये मिळाल्याने इंधन, देखभाल व कर्जहप्ते भागवणे कठीण होत असल्याची नाराजी व्यक्त केली जाते. त्यामुळे ‘ना वाहन दिवस’ पाळून आपल्या मागण्यांकडे सरकार व कंपन्यांचे लक्ष वेधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.(traveling)महाराष्ट्र कामगार सभेने या संपाचे आवाहन केले असून, चालकांनी शांततेत नियम पाळून आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. संघटनांनी प्रशासनाशी संवाद साधून दरवाढीचा तातडीने पुनर्विचार, कमिशन कपातीवर नियंत्रण आणि प्रोत्साहन रचनेत सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

मुंबई, पुणे, नागपूर व नाशिक येथे सर्वाधिक परिणाम दिसू शकतो. या काळात ॲपवर कॅब-रिक्षांची उपलब्धता घटल्यास भाडेदर वाढण्याची किंवा राईड कॅन्सलेशनची शक्यता आहे.(traveling)नागरिकांनी शक्य असल्यास प्रवासाची वेळ बदलणे, लोकल, मेट्रो, बेस्ट/पीएमपीएमएल बस व एसटीसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा आधार घेणे, तसेच आवश्यक तितकाच प्रवास करणे शहाणपणाचे ठरेल. एअरपोर्ट/रेल्वे प्रवासासाठी पुरेसा अतिरिक्त वेळ राखून ठेवणे आणि पर्यायी मार्गांची पूर्वतयारी करणे उपयोगी पडेल. परिस्थिती संध्याकाळीनंतर टप्प्याटप्प्याने सामान्य होण्याची शक्यता असून, चालक संघटनांकडून पुढील पावलांवर निर्णय घेण्यात येईल.

हेही वाचा :

देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

दिवाळीनंतर दैनंदिन वापरातील ‘या’ वस्तू स्वस्त होणार? मोदींनी दिले संकेत

माउंटबॅटन यांना भारतातील कोणत्या शहरात प्रेम झाले? त्यांची लव्हस्टोरी तुम्हाला नक्कीच माहीत नसेल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *