अमेरिकेने भारतावर उच्च शुल्क आकारले आहे. भारत आणि अमेरिकेत सध्या (developments)व्यापार चर्चा सुरू आहे. व्यापार करार पूर्ण होण्यापूर्वी भारतावर लावण्यात आलेले 50 टक्के शुल्क कमी करून 15 टक्क्यांवर आणावे, ही भारताची प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत ही मागणी पुर्ण होणार नाही, तोपर्यंत भारत करार करणार नसल्याची भूमिका भारताची आहे. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि चीनमधील संबंध बदलले. गेल्या काही वर्षात भारत आणि चीनमधील संबंध तणावपूर्ण राहिली. मात्र, अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावताच चीन भारतासाठी मैदानात आला आणि अमेरिकेच्या टॅरिफविरोधात थेट भूमिका घेतली. फक्त विरोधात भूमिकाच नाही तर भारतासोबत महत्वाचे करारही चीनने केले. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारतातून चीनमध्ये होणारी निर्यात प्रचंड वाढली.

भारताने चीनसोबतचे ताणलेले संबंध सुधारण्याचे आणि व्यापारी (developments)संबंधांमध्ये संतुलन साधण्याचे प्रयत्न सुरू केले. याचा उद्देश अमेरिकेच्या बाजारावरील अवलंबित्व कमी करणे आणि चीन, रशिया व इतर देशांमधील बाजारपेठांकडे व्यापार विस्तारणे हा आहे. नुकताच आलेल्या अहवालांनुसार, भारताची चीनसोबतची व्यापारी तूट आणखी वाढली आहे, चीनमधून होणारी आयातही वाढलीये.मागच्या काही वर्षातील आकडेवारी बघताच भारताची निर्यात तशी वाढली आहे. मात्र, चीनच्या तुलनेत कमी आहे. चीन भारतामध्ये त्यांच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह या आर्थिक संशोधन संस्थेच्या अहवालातून एक अत्यंत महत्वाची माहिती पुढे आली.

भारताला चीनची चिंता वाढवण्याची आणि न्यूझीलंडसारख्या (developments)बाजारपेठांमध्ये त्याच्या जागतिक वर्चस्वाला आव्हान देण्याची एक महत्त्वपूर्ण संधी आहे.2024-25 मध्ये न्यूझीलंडने चीनकडून 10 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीच्या वस्तू आयात केल्या. भारताकडून 711 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या वस्तू खरेदी केल्या. भारत पेट्रोलियम उत्पादनांच्या जगातील सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक आहे तर न्यूझीलंड दरवर्षी अंदाजे 6.1अब्ज अमेरिकन डॉलर्सची पेट्रोलियम उत्पादने आयात करतो. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारताने थेट न्यूझीलंडसोबत मुक्त व्यापार करार केला आहे. भारत आणि न्यूझीलंडमधील व्यापार वाढताना दिसतोय. न्यूझीलंडसोबत व्यापार वाढवून भारताने चीनला मोठा धक्का दिला.

हेही वाचा :

पार्टी ऑल नाईट! 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत

१ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते

घराच्या बाल्कनी आणि गॅलरीत कबुतरं येऊ नयेत यासाठी सोपे, मुघल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *