नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहे.(employees) नवीन वर्षात अनेक बदल होणार आहे. १ जानेवारी २०२६ पासून पैशांसंबंधित अनेक नियम बदलणार आहेत. याचा थेट परिणाम कर्मचारी, स्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांवर होणार आहे. यामध्ये बँकेचे नियम, सोशल मीडियाबाबत नियम, इंधनाच्या किंमती यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.नवीन वर्षात अनेक नियम बदलले जातात. २०२६ मध्येही अनेक सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. सोशल मिडिया आणि डेटा सिक्युरिटीसाठी नवीन नियम लागू करण्याची शक्यता आहे.

बँकेच्या क्रेडिट स्कोअर अपडेटबाबत महत्त्वाचा बदल केला जाणार आहे.(employees) क्रेडिट ब्युरोंना आता दर १५ दिवसांनी न देता दर आठवड्याला डेटा रिफ्रेश करावा लागेल. यामुळे ही सुविधा अधिक सोपी होईल.स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि एचडीएफसी बँकांनी कर्जावरील व्याजदर कमी केले आहे.या निर्णयाचा फायदा कर्जदारांना होणार आहे. तसेच सुधारित मुदत ठेव म्हणजे एफडीवरील नवीन व्याजदर २०२६ मध्ये लागू होणार आहे.आता यूपीआय आणि डिजिटल पेमेंटबाबत अनेक नियम कडक केले आहे. तसेच पॅन आणि आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही हे काम केले नाही तर पॅन कार्ड बंद होऊ शकते. यामुळे बँकेच्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात.फसवणूक आणि गैवापार रोखण्यासाठी सोशल मीडियाबाबतचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. आता व्हॉट्सअॅप, सिग्नल, टेलिग्रामसाठी सिम कार्ड पडताळणीचे नियम कडक करण्यात आले आहे.

३१ डिसेंबरला ७वा वेतन आयोग संपणार आहे. यानंतर नवीन वेतन आयोग लागू होणार आहे.(employees) याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार आहे. याचसोबत जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना नवीन महागाई भत्ता मिळणार आहे.आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. जर आयडी नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये.
हेही वाचा :
वारंवार पायात गोळे येत असतील तर व्हा सावध, या आजाराचे असू शकतील संकेत
‘धुरंधर’ने विदेशातील बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘या’ देशात करतोय विक्रमी कमाई
चहा-बिस्किटचं कॉम्बिनेशन शरीरारासाठी घातकEdit