केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.(government)त्याचसोबत विविध राज्य सरकारनेही महिलांसाठी योजना राबवल्या आहेत. बिहार सरकारने महिलांसाठी खास महिला रोजगार योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १०,००० रुपये मिळतात. दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अवघे ३ दिवस उरले आहेत. तुम्ही ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करु शकतात.३१ डिसेंबर २०२५ नंतर तुम्हाला महिला रोजगार योजनेत अर्ज करता येणार नाहीये. त्यामुळे महिलांसाठी ही शेवटची संधी आहे. बिहार सरकारची महिला रोजगार योजनेत महिलांना फक्त आर्थिक मदत नव्हे तर त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी मदत केली जाते. ही बिहारी सर्वाधिक लोकप्रिय झालेली योजना आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा हे जाणून घ्या.

महिला रोजगार योजना ही बिहार विधानसभा निवडणुकीसाठी(government)गेम चेंजर ठरली. या योजनेत अजूनही ज्या महिलांनी अर्ज केलेला नाही त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. या योजनेत तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.महिला रोजगार योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला बचत गटाशी जोडलेल्या असायला हव्यात. ग्रामीण भागातील महिलांना जवळच्या ग्राम विकास ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे.

तर शहरी भागातील महिलांना अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज करता येणार आहे.(government)याबाबतची पात्रता, अटी या सर्व वेबसाइटवर देण्यात आली आहे.बिहारच्या या योजनेत महिलांना १०,००० रुपये दिले जातात. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. बचत गटातील महिलांना लहान व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार मदत करते. या योजनेसाठी तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करु शकतात.

हेही वाचा :

या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते

सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *