उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. म्हणून,(eating) उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे, हायड्रेशन वाढवणारे आणि पोषणाने भरलेले आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीत, जांभूळ हे फळ आरोग्यासाठी “सुपरफूड” म्हणून ओळखले जाते. जांभूळ उन्हाळ्यात शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. या फळामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. जांभूळचे सेवन केल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात म्हणून आयुर्वेदात जांभूळाला एक उत्तम औषध मानले जाते. उन्हाळ्यात जांभूळ खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात,

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते
मधुमेहींसाठी जांभूळ एक वरदान मानले जाते. यामध्ये ‘जंबोलिन’ नावाचे एक संयुग असते, जे स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखते. केवळ फळच नाही, तर जांभळ्याच्या बियांची पावडरसुद्धा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. म्हणून मधमेही रुग्णांनी दररोजच्य आहारात जांभूळचा समावेश केला पाहिजे.
पोटाच्या समस्येपासून आराम
उन्हाळ्यात पचनक्रिया अनेकदा मंदावते, ज्यामुळे गॅस, अपचन आणि (eating) बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवतात. जांभळामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. म्हणून जांभूळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. तसेच पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत मिळते.
त्वचा निरोगी आणि चमकदार राहते
जांभळामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे उन्हाळ्यात त्वचेला सूर्याच्या हानिकारक यूव्ही किरणांपासून वाचवतात. तसेच जांभूळ खाल्ल्यामने रक्त शुद्ध होते, ज्यामुळे पिंपल्स, डाग दूर होण्यास आणि त्वचा उजळण्यास मदत होते. जांभळाचे नियमित सेवन त्वचा निरोगी आणि चमकदार होते.
हृदयासाठी फायदेशीर
जांभूळ नियमित खाल्ल्यास हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. या फळामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण सुधारते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पॅरालिसिसि सारख्या गंभीर आजारांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
रोगप्रतिकारशक्ती आणि हिमोग्लोबिन वाढते
जांभूळमधील आयरन शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतात, (eating) ज्यामुळे ॲनिमिया कमी होऊ शकतो. याव्यतिरिक्त, त्यातील व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते.
स्मरणशक्तीसाठी उपयोगी
जांभळामध्ये असलेले पोषक घटक मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करतात. काही अभ्यासांनुसार, या फळाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती आणि मेंदूची कार्यक्षमता वाढू शकते.
जांभूळ खाण्याची योग्य पद्धत
तु्म्ही जांभूळ कच्च्या स्वरूपात खाऊ शकता किंवा अनेक प्रकारे आहारात समाविष्ट करू शकता. जसे की, मीठ किंवा काळे मीठ लावून, दहीसोबत, फ्रूट सॅलडमध्ये, किंवा ज्यूस किंवा शेक स्वरूपात खाऊ शकता. ताजे आणि पूर्णपणे पिकलेले जांभूळ खाल्ल्यास त्याचे फायदे अधिक मिळतात.
हेही वाचा
शरद पवार भाकरी फिरवणार, 22-23 आमदार संपर्कात? नेमकं काय घडतयं?
पेट्रोलबाबत सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या काय असतील फायदे?
वडिलांच्या समोर कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावर १२ वर्षीय मुलगा बुडाला