मुंबई आणि ठाण्यात भाजप-शिंदेसेनेत सत्तासंघर्ष सुरू असून,(change) महापौर कोण होणार यावरून पेच वाढलेला असतानाच, चंद्रपुरातील सत्तास्थापनेचा पेच देखील आणखी वाढलाय. त्यातच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ माजली आहे. चंद्रपुरातील भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, असा धक्कादायक दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. तर भाजपच्या नगरसेवकांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवलंय, असं विधानही त्यांनी केलं आहे.

याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(change)भाजपचा महापौरच होईल अन्यथा विरोधी पक्षात बसू. काँग्रेसचे काही नगरसेवक आहेत, त्यांना वाटलं तर, भाजपसोबत यावं. ते यशस्वी किती होईल हे येणारा काळच ठरवेल, असे मुनगंटीवार म्हणाले. काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याबाबतच्या चर्चांवर काँग्रेस नेते वडेट्टीवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारणा केली. त्यावर काँग्रेसचे नाही तर भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आमचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात असण्याचा प्रश्नच नाही. (change)हे काहीतरी हवेत बाण मारण्याचा प्रकार आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा :

उद्या Toyota ची Electric SUV लाँच होणार! मिळणार धमाकेदार फीचर्स आणि किंमत फक्त…

झुरळांना संपवण्यासाठी हे पान करेल खूप मदत, पाण्यात टाका स्वयंपाक घरातील हा पदार्थ

कोल्हापुरात भाजपचा कंडका पडणार; शिंदे गट काँग्रेससोबत जाणार?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *